यू मुंबाचा सफाईदार विजय
कर्णधार मनजित चिल्लरने शेवटच्या दीड मिनिटात मिळवलेल्या तीन गुणांमुळेच पुणेरी पलटणला स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्सविरुद्ध २९-२७ असा विजय मिळवता आला. उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवणाऱ्या यू मुंबाने बंगाल वॉरियर्सवर ३२-२१ असा सफाईदार विजय नोंदवला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या लढतीत पुण्याने पूर्वार्धात १८-१० अशी आघाडी मिळवली होती. मात्र उत्तरार्धात बंगळुरू संघाच्या खेळाडूंनी चिवट लढत दिली. या विजयासह पुण्याचे आता १४ गुण झाले आहेत. यू मुंबाने पूर्वार्धात ११-९ अशी केवळ दोन गुणांची आघाडी घेतली होती. आता यु मुंबाने २० गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थान राखले आहे.
बंगालविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीला मुंबाच्या खेळाडूंनी सावध पवित्रा घेतला होता. उत्तरार्धात त्यांनी आक्रमक खेळ केला. २९व्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण नोंदवत बाजू बळकट केली. ३५व्या मिनिटाला त्यांनी २५-१७ अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण नोंदवत विजयाकडे वाटचाल केली. त्यांच्या विजयात रिशांक देवडिगाचा सिंहाचा वाटा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा