एअर इंडिया या मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात ६-० असा एकतर्फी विजय मिळविणाऱ्या पुणे क्लबचेच रविवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या आयलीग फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात वर्चस्व राहील अशी अपेक्षा आहे.
पुण्याने गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत तर एक सामना गमावला आहे. चर्चिल ब्रदर्सविरुद्ध त्यांना हार स्वीकारावी लागली होती. साखळी गटात पुण्याचे ४६ गुण झाले आहेत. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुण्याच्या तुलनेत एअर इंडियाची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांनी आतापर्यंत १९ गुण मिळविले असून साखळी गटात ते १३ व्या स्थानावर आहेत. त्यांनी गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने गमावले असून एक सामना अनिर्णीत ठेवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
एअर इंडियाविरुद्ध पुण्याचेच वर्चस्व
एअर इंडिया या मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात ६-० असा एकतर्फी विजय मिळविणाऱ्या पुणे क्लबचेच रविवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या आयलीग फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात वर्चस्व राहील अशी अपेक्षा आहे.
First published on: 28-04-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune dominant on air india