एअर इंडिया या मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात ६-० असा एकतर्फी विजय मिळविणाऱ्या पुणे क्लबचेच रविवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या आयलीग फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात वर्चस्व राहील अशी अपेक्षा आहे.
 पुण्याने गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत तर एक सामना गमावला आहे. चर्चिल ब्रदर्सविरुद्ध त्यांना हार स्वीकारावी लागली होती. साखळी गटात पुण्याचे ४६ गुण झाले आहेत. ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.  पुण्याच्या तुलनेत एअर इंडियाची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांनी आतापर्यंत १९ गुण मिळविले असून साखळी गटात ते १३ व्या स्थानावर आहेत. त्यांनी गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने गमावले असून एक सामना अनिर्णीत ठेवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा