यंग प्रभादेवी क्रीडा मंडळातर्फे हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्थानिक प्रथम श्रेणी गटात पुण्याच्या सतेज क्रीडा मंडळाने उपनगरमधील साहसी क्रीडा मंडळाला २२-६ असा सहज नमवत विजयी सलामी दिली. सतेज मंडळाने मध्यंतरालाच १०-२ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही आपले वर्चस्व टिकवून ठेवत त्यांनी विजय मिळवला. नीलेश काळशिटे आणि आत्माराम कदम यांच्या दमदार चढायांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
कुमार गटात मुंबईच्या विजय क्लबने १२ गुणांच्या फरकाने यंदाच्या उपनगर जिल्हा अजिंक्यपद विजेत्या बालमित्र क्रीडा मंडळाला पराभवाचा धक्का दिला. विजय स्पो. क्लबने २४-१२ असा आश्चर्यकारक विजय मिळवला. इ गटाच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने वीर परशुराम क्रीडा मंडळाचा २३-२२ असा फक्त एका गुणाने पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा