भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शनिवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये पुणे वॉरियर्स या आयपीएल संघाचे भवितव्य ठरणार आहे. सहारा ग्रुपची मालकी असलेल्या पुणे वॉरियर्सचे बीसीसीआयशी आर्थिक वाद सुरू आहेत. फ्रेन्चायझी शुल्क न भरणाऱ्या पुण वॉरियर्सची बँक हमी रक्कम बीसीसीआयने जप्त केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर सहारा ग्रुपने अयपीएलमधून आपण बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. सहारा ग्रुपने १७०.२ कोटी रुपये बँक हमी रक्कम न भरल्यास पुढील वर्षीच्या आयपीएल हंगामात त्यांना सहभागी होता येणार नाही.बीसीसीआयने सहारा ग्रुपला या थकबाकीची वारंवार सूचना केली. परंतु आता पुणे वॉरियर्सची आयपीएलमधून हकालपट्टी होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी होणाऱ्या बैठकीसाठी आयपीएल प्रशासकीय समितीच्या सर्व सदस्यांना बोलावण्यात आले आहे. बैठकीत चर्चा झाल्यानंतर पुणे वॉरियर्सला ३० दिवसांची निलंबनाची नोटीस देण्यात येईल.

Story img Loader