शनिवारपासून सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामात पुणे पलटण संघ नव्या ताकदीने आणि नव्या खेळाडूंसह जेतेपदाच्या निर्धाराने उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. उदयोन्मुख खेळाडूंचा शोध घेण्यासाठी पुणेरी पलटण संघाने पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये प्रशिक्षण शिबीर घेतले होते. ‘छोटे पुणेरी जेते’ या कार्यक्रमांतर्गत संघाने अनेक नव्या चेहऱ्यांना संघात संधी दिली आहे. याचबरोबर संघाने आपल्या बोधचिन्हातही बदल करून नव्या रूपाने मैदानात उतरण्याचा चंग बांधला आहे.
याबाबत पुणे पलटण संघाचे व्यवस्थापक कैलाश कांडपाल म्हणाले, ‘‘पुण्याचे प्रसिद्ध कबड्डीपटू अशोक िशदे यांची नेमणूक केल्यापासून संघात दुर्दम्य आशावाद संचारला आहे. आता आम्ही मागे वळून बघणार नाही. संघाने या हंगामासाठी कसून सराव केला आहे. संघात आता उत्साही तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे.’’
पुणेरी पलटण संघाचा पहिला सामना २० जुल रोजी मुंबई येथे तेलुगू टायटन संघाबरोबर आहे. या संघाचा घरच्या मदानावरील पहिला सामना १६ ऑगस्ट रोजी दबंग दिल्लीबरोबर होणार आहे. संघाचे मार्गदर्शक अशोक िशदे म्हणाले, ‘‘आम्ही अतिशय कसून, सातत्याने सराव केला आहे. आमचे खेळाडू सातत्याने शक्ती आणि सराव करण्याचे व्यायाम करीत आहेत, ज्याचा त्यांना पुढील सामन्यात उपयोग होईल. पुणेरी पलटण संघाच्या तरुण आणि उत्साही खेळाडूंना मार्गदर्शन करणे आणि प्रो-कबड्डीचा एक भाग होणे, हा माझ्यासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. येत्या हंगामात आमची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यासाठी आम्ही तयार आहोत.’’
प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंच्या प्रगतीचा मार्ग सुकर -गेहलोत
’‘‘‘देशाच्या कानाकोपऱ्यात, विविध स्तरांवर कबड्डी हा खेळ खेळला जातो. परंतु प्रो-कबड्डीच्या रूपाने खेळाला नवा आयाम मिळाला आहे. या स्पर्धेमुळेच खेळाडूंना आर्थिक सुबत्तेचा, प्रगतीचा मार्ग उपलब्ध झाला आहे,’’ असे भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दन सिंग गेहलोत यांनी सांगितले.
’‘‘भारतीय हौशी कबड्डी महासंघातर्फे खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत होते. मशाल स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स आणि आनंद महिंद्रा यांच्या पुढाकारामुळे प्रो-कबड्डी स्पर्धेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पहिल्या हंगामाला भरघोस प्रतिसाद मिळाला. पहिल्या हंगामातील त्रुटी बाजूला सारत नव्या उत्साहाने सर्व संघ तयार झाले आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.
’ते पुढे म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कबड्डीला स्थान मिळावे यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागला. संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या प्रयत्नांमुळे कबड्डीला आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान मिळाले. १९९०मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने पहिल्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. सांघिक प्रयत्नांचे ते यश होते. त्यामुळे तो क्षण कारकीर्दीतील मौल्यवान आठवण आहे. तेव्हापासून भारतीय संघ सातत्याने पदकावर नाव कोरत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.’’