शनिवारपासून सुरू होणाऱ्या प्रो-कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामात पुणे पलटण संघ नव्या ताकदीने आणि नव्या खेळाडूंसह जेतेपदाच्या निर्धाराने उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. उदयोन्मुख खेळाडूंचा शोध घेण्यासाठी पुणेरी पलटण संघाने पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये प्रशिक्षण शिबीर घेतले होते. ‘छोटे पुणेरी जेते’ या कार्यक्रमांतर्गत संघाने अनेक नव्या चेहऱ्यांना संघात संधी दिली आहे. याचबरोबर संघाने आपल्या बोधचिन्हातही बदल करून नव्या रूपाने मैदानात उतरण्याचा चंग बांधला आहे.
याबाबत पुणे पलटण संघाचे व्यवस्थापक कैलाश कांडपाल म्हणाले, ‘‘पुण्याचे प्रसिद्ध कबड्डीपटू अशोक िशदे यांची नेमणूक केल्यापासून संघात दुर्दम्य आशावाद संचारला आहे. आता आम्ही मागे वळून बघणार नाही. संघाने या हंगामासाठी कसून सराव केला आहे. संघात आता उत्साही तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे.’’
पुणेरी पलटण संघाचा पहिला सामना २० जुल रोजी मुंबई येथे तेलुगू टायटन संघाबरोबर आहे. या संघाचा घरच्या मदानावरील पहिला सामना १६ ऑगस्ट रोजी दबंग दिल्लीबरोबर होणार आहे. संघाचे मार्गदर्शक अशोक िशदे म्हणाले, ‘‘आम्ही अतिशय कसून, सातत्याने सराव केला आहे. आमचे खेळाडू सातत्याने शक्ती आणि सराव करण्याचे व्यायाम करीत आहेत, ज्याचा त्यांना पुढील सामन्यात उपयोग होईल. पुणेरी पलटण संघाच्या तरुण आणि उत्साही खेळाडूंना मार्गदर्शन करणे आणि प्रो-कबड्डीचा एक भाग होणे, हा माझ्यासाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. येत्या हंगामात आमची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यासाठी आम्ही तयार आहोत.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा