Shikhar Dhawan starting training for IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या तयारीला सर्व संघांनी सुरूलात केली आहे. संघांसोबतच खेळाडूही सज्ज झाले आहेत. या यादीत शिखर धवनचाही समावेश झाला आहे. शिखर धवनने आयपीएल २०२४ साठी तयारी सुरू केली आहे. नुकताच तो फलंदाजीचा सराव करताना दिसला. पंजाब किंग्सने धवन सराव करत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. शिखर धवन पंजाब किंग्जचा कर्णधार असून मागील हंगामात त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने ३७३ धावा केल्या होत्या.

वास्तविक पंजाबने किंग्जने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शिखर धवन फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. दरम्यान अनेक मोठे शॉट्स खेळतो. आयपीएलच्या पुढील हंगामात धवन एका नव्या शैलीमध्ये दिसणार आहे. जर शिखरच्या शेवटच्या हंगामाबद्दल बोलायचे, तर त्याने चांगली कामगिरी केली होती,पण तरीही त्याचा संघ विशेष काही करू शकला नाही. पंजाबचा संघ गुणतालिकेत केवळ आठव्या क्रमांकावर होता. आयपीएल २०२३ मध्ये धवनने ११ सामने खेळले. या त्याने कालावधीत ३७३ धावा झाल्या. तसेच शिखर धवनने तीन अर्धशतके झळकावली होती.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

आयपीएल २०२० धवनसाठी खूप चांगले होते. त्याने १७ सामन्यात ६१८ धावा केल्या होत्या. या काळात त्याने दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावल. धवनची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद १०६ धावा आहे. धवनची एकूण कामगिरी बघितली तर ती चांगली झाली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २१७ आयपीएल सामन्यांमध्ये ६६१७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ५० अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. या दरम्यान त्याने ७५० चौकार आणि १४८ षटकार मारले आहेत.

हेही वाचा – Google Search : भारतीयांनी २०२३ मध्ये विराट-रोहित नव्हे, तर ‘या’ क्रिकेटपटूला गुगलवर सर्वाधिक केले सर्च, जाणून घ्या कोण आहे?

शिखर धवन आणि कागिसो रबाडा पंजाब किंग्जचे सर्वात मोठे बलस्थान –

पंजाब किंग्जच्या भक्कम बाजूबद्दल बोलायचे झाले, तर ते त्यांचा कर्णधार शिखर धवन आहे. पंजाब किंग्सकडे प्रदीर्घ अनुभव असलेला खेळाडू आहे, त्याला कर्णधारपदाचाही चांगला अनुभव आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहलीनंतर शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट नेहमीच चांगला असतो आणि तो शांत मनाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर या संघात कागिसो रबाडासारखा जगातील सर्वात भयंकर वेगवान गोलंदाज आहे. ज्याच्याकडे कोणत्याही क्षणी विकेट घेण्याची क्षमता आहे. जर तो त्याच्या लयीत असेल, तर तो एकटा विरोधी संघाला सामन्यात गारद करु शकतो.

Story img Loader