Punjab Minister writes letter to BCCI officials: आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. ही स्पर्धा भारतातील १२ शहरांत खेळवली जाणार आहे. दरम्यन या स्पर्धेतील एकही सामना पंजाबच्या मोहाली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार नाही. त्यामुळे पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत हेअर यांनी बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांना पत्र लिहले आहे.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान मोहालीचा समावेश कोणत्या निकषांतर्गत मॅच होस्टिंग शहरांमध्ये करण्यात आला नाही, यावर या पत्रात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात हेयर म्हणाले की, पंजाबमध्ये सर्वोत्तम क्रीडा पायाभूत सुविधा आहेत. मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमला ​​दोन विश्वचषक उपांत्य फेरीचे सामने आयोजित करण्याचा मानही मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ranji Trophy 2025 Virat kohli eats Chilli Paneer in lunch during Delhi vs Railways match at Arun Jaitley Stadium Canteen vbm 97
Ranji Trophy 2025 : विराटने लंचब्रेकमध्ये छोले-भटूरे नव्हे तर ‘या’ पदार्थावर मारला ताव, कोणता होता तो? जाणून घ्या
National Sports Championship inaugurated in Uttarakhand sports news
तंदुरुस्त भारत घडवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांना आवाहन; उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
Varun Chakravarthy 5 Wicket Haul IND vs ENG 3rd T20I Rajkot Watch Video
IND vs ENG: वरूण चक्रवर्तीने ५ विकेट्स घेत घडवला इतिहास, बुमराह-शमी कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
gahunje stadium ind vs eng t 20 match
Ind vs Eng : कोल्डप्लेसाठी स्वतंत्र ट्रेन, पण पुणेकरांना साधी बसही मिळेना; भारत वि. इंग्लंड सामन्यासाठी पोहोचण्याचा मनस्ताप अटळ!
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध
Mumbai to Ahmedabad special trains for Cold Play Concert Mumbai print news | 'कोल्ड प्ले'साठी मुंबई-अहमदाबाद विशेष रेल्वेगाड्या Mumbai to Ahmedabad special trains for Cold Play Concert Mumbai print news
‘कोल्ड प्ले’साठी मुंबई-अहमदाबाद विशेष रेल्वेगाड्या

पंजाबच्या मंत्र्याने बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या मीडियातील वक्तव्याचाही संदर्भ दिला. ते पुढे म्हणाले की शुक्ला यांनी पीसीएला सांगितले होते की मोहाली स्टेडियम “सामने आयोजित करण्यासाठी आयसीसीच्या निकषांची पूर्तता करत नाही.”

हेही वाचा – ENG vs AUS: “इंग्लंड आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या मर्यादेपलीकडे…”,स्टोक्स आणि मॅक्युलमच्या रणनीतीवर मार्क बुचरची सडकून टीका

आयसीसीचे कोणते निकष आहेत, ज्याच्या आधारावर मोहालीला अपात्र ठरवले –

हेयर यांनी पत्रात लिहिले, “मला विश्वास आहे की या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणात पंजाबला न्याय मिळेल.” हेअर म्हणाले की, त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, आयसीसीचे कोणते निकष आहेत ज्याच्या आधारावर मोहालीला क्रिकेट विश्वचषक सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले.
त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “याशिवाय, सप्टेंबर २०२२ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळवण्यात आल्याने सध्याच्या नियमांमध्ये केलेले कोणतेही बदल देखील समोर आणले पाहिजेत. याशिवाय, यापूर्वी दोन उपांत्य फेरीसह एकदिवसीय विश्वचषक सामनेही खेळले गेले होते.”

हेही वाचा – Yashasvi Jaiswal: “जर कोणी माझ्या आई किंवा बहिणीबद्दल बोलले तर…”, स्लेजिंगवर यशस्वी जैस्वालच मोठं वक्तव्य

पीसीए स्टेडियम जगातील प्रमुख स्टेडियमपैकी एक –

हेअर म्हणाले की, आयसीसी पथकाने मोहाली स्टेडियमला ​​भेट देऊन मानकांची पाहणी केली होती का? हेही सांगितले पाहिजे. ते म्हणाले, “पीसीए स्टेडियम मोहाली हे केवळ भारतातील अव्वल स्टेडियमपैकी एक नाही, तर जगातील आघाडीच्या स्टेडियममध्येही आहे. मोहाली नेहमीच क्रिकेटप्रेमींची पहिली पसंती राहिली आहे. मोहालीला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि शहरात चांगली पायाभूत सुविधा आणि संघांना राहण्यासाठी पुरेशी हॉटेल्स आहेत.”

Story img Loader