ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी आणि तरूण फलंदाज फिलिप ह्युजेसचा गुरूवारी दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर सारे जग हादरून गेले. त्यानंतर सोशल मिडीयावर फिल ह्युजेसला जगभरातून अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली जात आहे. गुगल ऑस्ट्रेलियाकडून डुडलद्वारे फिजला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तर पॉल टेलर या क्रिकेट चाहत्याने ऑस्ट्रेलियन खेळांडूची ओळख असणारी क्रिकेट कॅप घातलेली बॅट स्वत:च्या घराच्या दरवाजाबाहेर भिंतीला टेकून ठेवल्याचे छायाचित्र ‘पुट आऊट युअर बॅटस’ हे हॅश टॅग वापरून ट्विट केले. त्यानंतर ‘पुट आऊट युअर बॅटस’ या टॅगअंतर्गत जगभरातील क्रिकेट खेळाडू आणि चाहते या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Putoutyourbats emotional twitter google pay tribute to phillip hughes