PV Sindhu getting married : भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पी.व्ही. सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिचा विवाह २२ डिसेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे. सिंधू ही व्यंकट दत्ता साईशी लग्न करणार आहे. ते वरिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पी.व्ही. सिंधूचे वडील पी.व्ही. रमणा यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीच ओळखत होते, परंतु एक महिन्यापूर्वीच लग्न ठरले आहे. त्यांनी पीटीआयला सांगितले की, “सिंधूचे जानेवारीपासून बॅडमिंटनचे खूप व्यस्त वेळापत्रक असेल, त्यामुळे डिसेंबर हा लग्नाचा सर्वोत्तम काळ आहे. २२ डिसेंबरला उदयपूरमध्ये लग्न होणार असून २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. यानंतर सिंधू तिच्या प्रशिक्षणात परतेल, कारण पुढचा हंगाम तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”

कोण आहे व्यंकट दत्ता साई?

व्यंकट दत्ता साई हे पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि ते भारतीय महसूल सेवेत (आएरएस) अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पी. व्ही. सिंधूने या कंपनीचा नवीन लोगो लॉन्च केला होता.

हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित भाई, १० वर्षे झाली…’, हिटमॅनने ऑटोग्राफच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्याची पूर्ण केली इच्छा, पाहा VIDEO

व्यंकट दत्ता साई यांचा व्यावसायिक प्रवास –

साई यांनी जेएसडब्ल्यू आणि सोलर अॅपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले आहे. डिसेंबर २०१९ पासून, ते पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच्या कामात एचडीएफसी आणि आयसीआयसीआयसारख्या अनेक मोठ्या बँकांसाठी उपाय तयार करणे, जलद कर्ज प्रक्रिया आणि क्रेडिट स्कोअर जुळण्यासारख्या सुविधा प्रदान करणे समाविष्ट आहे.

हेही वाचा – WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारत कसा पात्र ठरेल? कोणती आहेत चार समीकरणं? जाणून घ्या

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पाच पदकांवर कोरलंय नाव –

पी.व्ही सिंधू ही भारतातील सर्वात दिग्गज बॅडमिंटनपटूंपैकी एक मानली जाते, तिने २०१९ मध्ये सुवर्ण पदकांसह जागतिक स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत. याशिवाय तिने ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदकं जिंकली आहेत. या चॅम्पियन बॅडमिंटनपटूने रिओ २०१६ आणि टोकियो २०२० मध्ये सलग ऑलिम्पिक पदके जिंकली होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू आहे. तिच्या मनू भाकेर, सुशील कुमार आणि नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. सिंधूने २०१७ मध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pv sindhu is getting married soon know what her husband venkat datta sai is doing vbm