विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा:
युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले असून स्पर्धेत सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
उपांत्य फेरीत रात्चानोक इन्थानोन या थायलंडच्या बॅडमिंचनपटूने पी.व्ही.सिंधूचा २१-१०, २१-१३ असा पराभव केला. पहिल्याच विश्व अजिंक्यपद स्पर्धेत खेळणाऱ्या १८ वर्षीय सिंधूने चीनची बलाढय़ खेळाडू शिझियान वांग हिच्यावर सरळ गेममध्ये मात करून उपांत्य फेरी गाठली होती. परंतु, उपांत्य फेरीत सिंधूला सुर गवसला नाही. पहिल्याच सेटमध्ये इन्थानोनने सामन्यात मजबूत पकड ठेवली आणि दुसऱया सेटमध्ये विजयी आघाडी घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीचे दार ठोठावले. या पराभवामुळे पी.व्ही.सिंधूचे विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा