2024 Paris Olympic Live Updates, Day 2: तिसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी आतूर बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने मालदीवच्या फतिमा अब्दुल रझ्झाकचा २१-९, २१-६ असा धुव्वा उडवला. एखाद्या सराव सामन्याप्रमाणे खेळ करत सिंधूने अर्ध्या तासात रझ्झाकचे आव्हान संपुष्टात आणलं.

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अभिनव बिंद्रा (नेमबाजी, २००८) आणि नीरज चोप्रा (भालाफेक, २०२२) यांनाच वैयक्तिक सुवर्णपदक जिंकता आले आहे. गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांतील यशानंतर सिंधूला आता ऑलिम्पिकमधील भारताची पहिली महिला सुवर्णपदक विजेती म्हणून इतिहास घडवण्याची संधी आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आपण उत्सुक असून त्या दृष्टीनेच तयारी करत असल्याचे सिंधूने पॅरिसला रवाना होण्यापूर्वी सांगितलं होतं.

IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Maharashtra News Updates
Maharashtra Assembly Special Session : पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू
jaipur literature festival will be held from january 30 to february 3 zws
बुकबातमी : जयपूर लिटफेस्टमध्ये यंदा मराठीसुद्धा…
Major changes in Mumbais traffic for swearing-in ceremony
शपथविधीसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल
Mumbai beat Services team on the strength of Suryakumar Yadav and Shivam Dube prithvi shaw duck against Services
SMAT 2024 : मुंबईच्या विजयात सूर्या-शिवम आणि शार्दुल चमकले, तर पृथ्वी शॉने पुन्हा केले निराश

गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवल्यानंतर सिंधू पदकाचा रंग बदलण्यासाठी उत्सुक आहे. ‘‘२०१६ आणि २०२० च्या स्पर्धेतील प्रवास अविस्मरणीय होता. या दोन्ही स्पर्धांत पदकापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. आता पॅरिस येथे होणारी स्पर्धाही याला अपवाद ठरणार नाही. मी नव्या जोमाने या स्पर्धेत उतरेन आणि काहीही झाले तरी १०० टक्के देऊनच खेळेन,’’ असा विश्वास सिंधूने व्यक्त केला होता.

‘‘याआधीच्या ऑलिम्पिकमधील अनुभवांनी खेळाडू म्हणून मला समृद्ध केले आहे. या अनुभवांचा मला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे फायदा होईल. पदकाबाबत मला अतिआत्मविश्वास बाळगायचा नाही. मी पूर्ण तयारीनिशीच या स्पर्धेत उतरेन. देशाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असं सिंधूने सांगितलं होतं.

Story img Loader