पी.व्ही.सिंधूने रविवारी कोरियाच्या किम ह्य़ो मिनचा पराभव करत मकाउ ग्राँपी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपद पटकावले आहे. मकाउ बॅडमिंटन ग्राँप्रीतील जेतेपदामुळे सिंधूने सुवर्ण पदकासह एक लाख २० हजार अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. ४५ मिनिटे चाललेल्या या खेळात जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या सिंधूने किमचा २१-१२ आणि २१-१७ गेममध्ये पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच पी.व्ही.सिंधूने सलग दुस-यांदा मकाऊ ग्राँपी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे.

Story img Loader