शॉन राइट-फिलीप्सच्या एकमेव गोलच्या जोरावर क्वीन्स पार्क रेंजर्सने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत चेल्सीला पराभवाचा धक्का दिला. ७८व्या मिनिटाला शानदार गोल करत राइटने क्वीन्स पार्क रेंजर्सला गुणतालिकेत आघाडी मिळवून दिली. या पराभवामुळे चेल्सीला गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावता आले नाही.
आम्ही सर्वोत्तम खेळ केला आणि म्हणूनच विजय मिळवू शकलो असे उद्गार क्वीन्स पार्क रेंजर्सचे व्यवस्थापक रेडनॅप यांनी काढले.
चेल्सीचे हंगामी प्रशिक्षक राफेल बेनिटेझ यांनी संघात पाच बदल केले. यामध्ये अॅशले कोल, रामिरेस, ज्युऑन माटा, इडन हॅझार्ड यांना तसेच दुखापतग्रस्त पीट्र सेकला डच्चू देण्यात आला. हे घाऊक बदल चेल्सीच्या पराभवाचे कारण ठरले. पहिल्या सत्रात चेल्सीतर्फे गोलसाठी प्रयत्न झाले मात्र त्यांच्या खेळाचा दर्जा सर्वसाधारण होता. ७८व्या मिनिटाला अडेल तारबेटने दिलेल्या पासचा उपयोग करुन घेत राइटने गोल केला आणि चेल्सीच्या सलग चार विजयांची मालिका खंडित केली.
अन्य लढतींमध्ये इव्हर्टनने न्यू कॅस्टलवर २-१ने मात केली. न्यूकॅस्टलतर्फे पॅपिस सिसने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत खाते उघडले मात्र त्यानंतर इव्हर्टनचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. इव्हर्टनसाठी लेघटन बेइन्सने ४३व्या तर व्हिक्टर अनिचइबेने ६०व्या मिनिटाला गोल केला. लिव्हरपूलने सदरलँण्डचा ३-० असा धुव्वा उडवला. रहीम स्टर्लिगने पहिला गोल केला. ल्युएस सुरेझने २६व्या आणि ५३व्या मिनिटाला गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धा : क्वीन्स पार्क रेंजर्सचा चेल्सीला धक्का
शॉन राइट-फिलीप्सच्या एकमेव गोलच्या जोरावर क्वीन्स पार्क रेंजर्सने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत चेल्सीला पराभवाचा धक्का दिला. ७८व्या मिनिटाला शानदार गोल करत राइटने क्वीन्स पार्क रेंजर्सला गुणतालिकेत आघाडी मिळवून दिली. या पराभवामुळे चेल्सीला गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावता आले नाही.
First published on: 04-01-2013 at 02:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qpr stun chelsea everton and liverpool on the up