Quinton de Kock became the first batsman to score a century in ICC World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या चौथ्या साखळी सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डी कॉक आणि व्हॅन डर डुसेन यांनी श्रीलंकेविरुद्ध शानदार शतकं झळकावली. हे दोन्ही फलंदाज या सामन्यात शतक पूर्ण करणारे पहिले फलंदाज होण्यासाठी स्पर्धा करत होते, परंतु यामध्ये क्विंटन डी कॉकने बाजी मारली. तो या एकदिवसीय विश्वचषकात प्रोटीजसाठी शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. यानंतर वेड डर डुसेननेही आपले शतक पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट अवघ्या १० धावांच्या धावसंख्येवर पडली, जेव्हा कर्णधार टेम्बा बावुमा केवळ ८ धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर डी कॉक आणि डुसेन यांनी आपल्या संघाचा डाव केवळ हाताळला नाही, तर त्यांना मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात यशस्वीही झाले. या दोन फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७४ चेंडूत २०४ धावांची भागीदारी झाली.

डी कॉकने ८३ चेंडूत झळकावले शतक –

या सामन्यातील डी’कॉर्डच्या खेळीतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो सुरुवातीला त्याच्या आक्रमक शैलीत अजिबात दिसला नाही. त्याने आपले अर्धशतक ६१ चेंडूत पूर्ण केले, मात्र तो स्थिरावल्यानंतर त्याने ८३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या संघासाठी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला, तर त्याच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील हे १८ वे शतक होते. क्विंटन डी कॉकने या सामन्यात पाथिरानावर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतक झळकावल्यानंतर तो लगेचच बाद झाला. या सामन्यात त्याने ८४ चेंडूत १०० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ षटकार आणि १२ चौकार लगावले.

हेही वाचा – World Cup 2023 BAN vs AFG: बांगलादेशचा अफगाणिस्तानवर ६ विकेट्सने दणदणीत विजय, मेहदी हसन ठरला सामनावीर

व्हॅन डर डुसेननेही खेळली शतकी खेळी –

कर्णधार टेम्बा बावुमा बाद झाल्यानंतर या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्हॅन डर ड्युसेननेही चांगली फलंदाजी करत १०३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ५ वे शतक होते आणि या एकदिवसीय विश्वचषकातील त्याचे पहिले शतक होते. ड्युसेनचा हा ५० वा एकदिवसीय सामना होता, जो त्याने आपल्या शतकासह संस्मरणीय बनवला. आपल्या शतकी खेळीमध्ये त्याने १२ चौकार आणि २ शानदार षटकारही मारले. या सामन्यात डुसेनने ११० चेंडूत १०८ धावांची खेळी खेळली आणि यादरम्यान त्याने २ षटकार आणि ३ चौकार मारले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quinton de kock became the first batsman to score a century in icc world cup 2023 in sa vs sl match vbm
Show comments