New Zealand vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३२ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात पुण्यात खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावत इतिहास रचला आहे. विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो त्याच्या संघाचा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच यंदाच्या विश्वचषकातील हे त्याचे चौथे शतक आहे. त्याने श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकाराच्या ४ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. क्विंटन डी कॉकने १०३ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकाच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज –

४८६* – क्विंटन डी कॉक – सात डाव – २०२३
४८५ – जॅक कॅलिस – नऊ डाव – २००७
४८२ – एबी डिव्हिलियर्स – सात डाव – २०१५
४४३ – ग्रॅम स्मिथ – १० डाव – २००७
४१० – पीटर कर्स्टन – आठ डाव – १९९२

आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकची बॅट चांगलीच तळपत आहे. क्विंटन डी कॉकने न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक झळकावून इतिहास रचला आहे. या विश्वचषकात डी कॉकचे हे चौथे शतक आहे. विश्वचषकात ४ किंवा त्याहून अधिक शतके करणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर तो रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. रोहित शर्माने २०१९च्या विश्वचषकात एकूण पाच शतकं झळकावली होती.

हेही वाचा – World Cup 2023: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! गोल्फ खेळताना ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

एका विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज –

५ – रोहित शर्मा (२०१९)
४ – कुमार संगकारा (२०१५)
४ – क्विंटन डी कॉक (२०२३)*
३ – मार्क वॉ (१९९६)
३ – सौरव गांगुली (२००३)
३ – मॅथ्यू हेडन (२००७)
३ – डेव्हिड वॉर्नर (२०१९)

क्विंटन डी कॉकने ११६ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११४ धावांची खेळी साकारली. या बरोबरच त्याने रॅसी वॅन डर डुसेनसोबत दुसऱ्या विकेट्साठी विक्रमी २०० धावांची भागीदारी केली.

भारतात सर्वाधिक एकदिवसीय शतकं झळकावणारे विदेशी फलंदाज –

७ – एबी डिव्हिलियर्स (२० डाव)
६ – क्विंटन डी कॉक (१५)
६ – ख्रिस गेल (२३)
५ – रिकी पाँटिंग (४६)