आयपीएलच्या आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांनी आपापसात खेळाडूची अदलाबदल करण्याचं ठरवलं आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या करारानुसार दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने डी कॉकला 2.8 कोटी रुपये खर्च करुन खरेदी केलं होतं. EspnCricinfo या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, क्विंटन डी कॉकच्या मोबदल्यात मुंबईने मुस्तफिजूर रेहमान आणि अकिला धनंजया यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात सध्या इशान किशन आणि आदित्य तरे हे दोन यष्टीरक्षक आहेत. मात्र क्विंटन डी-कॉकला वेस्ट इंडिजच्या एविन लुईससोबत फलंदाजीसाठी पाठवण्यात येऊ शकतं. आयपीएलमधला मुंबई इंडियन्स हा डी कॉकचा चौथा संघ ठरणार आहे. याआधी सनराईजर्स हैदराबाद, दिल्ली डेअरडेविल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून डी-कॉकने आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे.

Story img Loader