भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना शनिवारी पार पडला. नागपुरात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात फिरकीपटू आर आश्विनने विजयात मोलाचे योगदान देताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. ज्यामध्ये त्याने अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि नॅथन लायनसारख्या गोलंदाजांना मागे टाकले. हा कारनामा त्याने दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेऊन केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अश्विनने कारकिर्दीतील ३१ वेळा पाच बळी घेतले. यासह त्याने भारताकडून सर्वाधिक वेळा ५ बळी घेण्याच्या बाबतीत अनुभवी अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्यात तो सर्वात वेगवान ४५० कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताचा महान लेग-स्पिनर अनिल कुंबळेने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत २५ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने ११ वर्षांच्या कारकिर्दीत हे स्थान मिळवले. ऑफस्पिनर अश्विन हा कसोटी इतिहासातील ३१ वेळा पाच बळी घेणारा सातवा गोलंदाज ठरला आहे. सक्रिय क्रिकेटपटूंच्या यादीत जेम्स अँडरसन (३२) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पाच बळी घेत अश्विनने घरच्या मैदानावर त्याच्या विकेटची संख्या ३२० वर नेली. जे ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नपेक्षा एक जास्त आहे. यापैकी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात ९७ विकेट्स घेतल्या आहेत. जो अनिल कुंबळे (१११) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने या बाबतीत हरभजन सिंग आणि नॅथन लायनला मागे टाकले आहे.

हेही वाचा – IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत रचला मोठा विक्रम; ७६ वर्षात तिसऱ्यांदा केला ‘हा’ पराक्रम

ऑफस्पिनर आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी पूर्ण केले आहेत. हा टप्पा गाठणारा तो सर्वात जलद भारतीय गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम यापूर्वी दिग्गज अनिल कुंबळेच्या नावावर होता. त्याने ९३ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता. आता अश्विनने ८९व्या कसोटीत ४५० बळी पूर्ण केले.

हेही वाचा – IND vs AUS: टीम इंडियाच्या विजयानंतर आर आश्विनची महत्वाची प्रतिक्रिया; ‘या’ युनिटला दिले विजयाचे श्रेय

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ४५० विकेट घेणारे गोलंदाज –

मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ८० कसोटी
अनिल कुंबळे (भारत) – ९३ कसोटी सामने
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – १०० कसोटी सामने
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – १०१ कसोटी सामने
नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया) – ११२ कसोटी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin broke the record of kumble harbhajan nathan and warne by taking five wickets against aus test match vbm