R Ashwin Father Shocking Claim on Son’s Retirement: गाबा कसोटी संपताच आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. त्याने जाहीर केलेल्या अचानक निवृत्तीनंतर अश्विनने मालिकेच्या मध्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली यावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पण आता त्याच्या वडिलांनी धक्कादायक वक्तव्य करत अश्विनच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विनच्या वडिलांनी CNN न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत मोठा दावा केला की, टीम इंडियामध्ये अश्विनचा अपमान झाला, त्यामुळे त्याने अचानक निवृत्ती घेतली. अश्विनच्या वडिलांनी या मुलाखतीत बोलताना आरोप केला आहे की त्यांच्या मुलाचा सतत अपमान केला जात होता ज्यामुळे त्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यभागी निवृत्तीची घोषणा केली असावी. आपल्या मुलाच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयाने मलाही धक्का बसला आहे, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

हेही वाचा – R Ashwin: अश्विनचं निवृत्तीनंतर भारतात परतताच जंगी स्वागत, चेन्नईतील घरी पोहोचताच आई-वडिल झाले भावुक; पाहा VIDEO

अश्विनचे ​​वडील म्हणाले, “मलाही शेवटच्या क्षणी निवृत्तीची माहिती मिळाली. त्याच्या मनात काय चालले होते मला माहित नाही. त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. मीही त्याचा हा निर्णय स्वीकारला, पण त्याने ज्या प्रकारे निवृत्ती घेतली त्यावर मी आनंदी आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, कारण त्याने अजून खेळत राहायला हवे होते. निवृत्ती घेणं हा अश्विनचा निर्णय होता आणि मी त्यात हस्तक्षेप करणार नाही, पण त्याने ज्या पद्धतीने निवृत्ती घेतली त्यामागे अनेक कारणं असू शकतात. ते फक्त अश्विनलाच माहित आहे, अपमान हे यामागे एक कारण असण्याची शक्यता आहे.”

हेही वाचा – WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण?

अश्विनचे ​​वडील पुढे म्हणाले, “अश्विनची निवृत्ती हा आमच्यासाठी भावनिक क्षण आहे कारण तो १४-१५ वर्षे खेळला आणि त्याच्या अचानक निवृत्तीने आम्हाला धक्का बसला आहे. पण तो निवृत्ती घेईल अशी अपेक्षा आम्हाला होतीच कारण त्याचा सातत्याने अपमान होत होता. तो अजून किती दिवस हे सर्व सहन करू शकणार होता?, म्हणूनच अश्विनने स्वत: निवृत्तीचा निर्णय घेतला.”

हेही वाचा – R Ashwin: “मला अजिबात पश्चाताप नाही, मी बऱ्याच जणांना…”, अश्विनचे निवृत्तीनंतर पहिलं वक्तव्य, राहत्या घरी पोहोचताच नेमकं काय म्हणाला?

दरम्यान अश्विननेही त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामागील नेमके कारण काय आहे हे सांगितले नाही. विशेष म्हणजे, भारताचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी सांगितले की, अश्विनच्या मनात बऱ्याच काळापासून निवृत्ती घेण्याचा निर्णय होता, त्यानेच अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड ओव्हल येथे होणाऱ्या पिंक बॉल कसोटीपर्यंत थांबण्यासाठी विनंती केली होती. अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो मायदेशी परतला असून त्याचे चेन्नईमध्ये राहत्या घरी जंगी स्वागत करण्यात आलं. अश्विन येताच त्याच्या वडिलांनी त्याला मिठी मारली तर आईला अश्रू अनावर झाले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin father shocking statement on his retirement that forced legend to retire said he was being humiliated bdg