बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आश्विनच्या शानदार खेळीच्या जोरावर विजय मिळवला. भारताने दुसऱ्या सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवताना, मालिका २-० ने आपल्या नावावर केली. या सामन्यात अश्विनने आपल्या ४२ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर त्याने कसोटी कारकिर्दीत ३००० धावाही पूर्ण केल्या. हे करत त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशविरुद्ध अश्विनने ६२ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांसह ४२ धावांची नाबाद खेळी साकारली. अश्विनने श्रेयस अय्यरसोबत ८व्या विकेटसाठी नाबाद ७१ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे सामन्याचे चित्र पालटले. अय्यर २९ धावा करून नाबाद राहिला. अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४२ धावांच्या खेळीत ३००० धावाही पूर्ण केल्या. त्याचबरोबर त्याने तीन दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले.

कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा आणि ४०० बळींचा दुहेरी धमाका करणारा, अश्विन जगातील दुसरा सर्वात वेगवान अष्टपैलू खेळाडू बनला आहे. अश्विनने कसोटीत ८८ सामन्यांमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. ८८ कसोटी सामन्यांपर्यंत अश्विनच्या कसोटीत ३०४३ धावा आणि ४४९ विकेट्स आहेत. या प्रकरणात, रिचर्ड हॅडली हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० आणि ४०० बळींचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरला आहे. आपल्या ८६ व्या सामन्यात हा दुहेरी धडाका पूर्ण करण्यात तो यशस्वी ठरला.

आता अश्विनने शेन वॉर्न, स्टुअर्ट ब्रॉड, कपिल देव, शॉन पोलॉक यांना मागे टाकले आहे. शेन वॉर्नला ३००० धावा आणि ४०० बळींचा दुहेरी धमाका गाठण्यासाठी १४२ कसोटी सामने खेळावे लागले. इंग्लंडच्या ब्रॉडने १२१ कसोटी सामने खेळले, तर कपिल देवने ११५ कसोटी सामने खेळले. दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉकने १०८ कसोटी सामने खेळले.

हेही वाचा – PAK vs NZ 1st Test: बाबर आझमने पाकिस्तानसाठी रचला इतिहास; युसूफचा १६ वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम काढला मोडीत

… तर तो जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरणार –

आता अश्विन एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला, तर कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरेल. ज्यांच्या नावावर ३००० कसोटी धावा आणि ४५० हून अधिक बळींची नोंद आहे. कारण आता त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४४९ विकेट्सची नोंद आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin has become the second fastest player in the world to score 3000 runs and 400 wickets in test cricket vbm