मुंबई : एकदिवसीय विश्वचषकासाठी इशान किशनची भारतीय संघातील निवड योग्यच आहे. किशनच्या समावेशामुळे भारतीय संघाचा दुहेरी फायदा झाला आहे. त्याच्यात आणि संजू सॅमसन यांच्यात स्पर्धा नव्हतीच, असे मत अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मायदेशात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय प्राथमिक संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. या संघात किशन आणि केएल राहुल या दोन यष्टिरक्षक-फलंदाजांना स्थान मिळाले आहे, तर सॅमसनला डावलण्यात आले आहे. ‘‘किशन आणि सॅमसन यांच्यात स्पर्धा होती असे मला मुळीच वाटत नाही. १५ सदस्यीय संघ निवडताना तुम्हाला अतिरिक्त यष्टिरक्षक-फलंदाजाची निवड करावीच लागते. किशनच्या समावेशामुळे भारतीय संघाचा दुहेरी फायदा झाला आहे. किशन अतिरिक्त यष्टिरक्षक आहेच, शिवाय तो राखीव सलामीवीरही आहे. किशन पाचव्या क्रमांकावर खेळू शकत नाही असे म्हटले जात होते. मात्र, त्याने हे मत खोडून काढले,’’ असे अश्विनने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin opinion on world cup squad selection double benefit due to ishan kishan amy