R Ashwin reacts to Jonny Bairstow’s controversial run out: पाच कसोटी सामन्याच्या ॲशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्डसवर पार पडला. रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. तसेच मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यातील ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयापेक्षा जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआऊटचीच चर्चा जास्त आहे. यावर आजी माजी खेळाडूंनी आपपाल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या प्रकरणावर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी अनेक विद्यमान आणि माजी खेळाडूंची वेगवेगळी मते समोर येत आहेत. काहीजण  ॲलेक्स कॅरीच्या कृत्तीला खेळ भावनेच्या विरोधात असल्याचे म्हणत आहेत, तर काहीजण त्याच्या बाजूनेही आहेत. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननेही ॲलेक्स कॅरीला समर्थन दिले आहे. आश्विनच्या मते हे प्रकरण खेळ भावनेत गुंडाळण्याऐवजी खेळाडूच्या स्मार्टनेसचे कौतुक केले पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

खरं तर, इंग्लंडच्या डावातील ५२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा शॉर्ट बॉल मागे सोडला होता. यानंतर, बेअरस्टो लगेच क्रीझच्या बाहेर गेला, जेव्हा चेंडू डेड झाला झाला नव्हता आणि यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने तो आपल्या ग्लोव्हजमध्ये पकडला आणि स्टंपच्या दिशेने परत फेकला, ज्यामुळे बेल्स विखुरल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाने आऊटची अपील केली. यानंतर थर्ड अंपायरने जॉनीला आऊट घोषित केले.

हेही वाचा – Ashes Series 2023: विराट कोहलीकडून बेन स्टोक्सच्या खेळीचे कौतुक; म्हणाला, “मी बेन स्टोक्सला…”

बेअरस्टोने येथे चूक केली आणि ती लक्षात येईपर्यंत कॅरीने आपले काम केले होते. पण आता ते खेळ भावनेच्या विरोधात बोलले जात आहे. कारण बेअरस्टोचा येथे धाव घेण्याचा हेतू नव्हता आणि तो फक्त षटक संपल्यानंतर त्याचा सहकारी फलंदाज कर्णधार बेन स्टोक्सशी चर्चा करायला चालला होता.

मात्र टीम इंडियाचा गोलंदाज अश्विनने ऑस्ट्रेलिया आणि ॲलेक्स कॅरीच्या या कृत्तीने स्वागत केले आहे. अश्विनने ट्विट करताना लिहिले की, “आपण एक सत्य अगदी सोप्या आणि स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. एवढ्या दुरून कीपर कधीच स्टंपवर थ्रो मारणार नाही, जोपर्यंत त्याला किंवा त्याच्या संघाच्या लक्षात येत नाही की बॉल सोडल्यानंतर फलंदाज क्रीज सोडत आहे, बेअरस्टोने केल्याप्रमाणे एक पॅटर्न तयार झाला आहे.”

अश्विनने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “आपण त्या खेळाडूला अनुचित खेळ किंवा खिलाडूवृत्ती यांसारख्या प्रश्नांमध्ये घेरण्याऐवजी त्याच्या स्मार्टनेसची प्रशंसा केली पाहिजे.” अश्विनलाही अनेकवेळा अशा कृतींसाठी प्रश्नांनी घेरले आहे. तो नियमानुसार योग्य काम करताना दिसला आहे. मांकडिंगला पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे श्रेय अश्विनला जाते, ज्याने आयपीएलमध्ये जोस बटलरला बाद केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin praises alex carey while reacting to jonny bairstows controversial run out vbm