R Ashwin reveals Rahul Dravid’s hour long discussion with waiter and bartender: ॲशेस २०२३ मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स इथे खेळला गेला. या सामन्यातील दुसऱ्या डावात जॉनी बेअरस्टोलाॲलेक्स कॅरीने रनआऊट केले, तेव्हा जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा वाद निर्माण झाला होता. बेअरस्टोच्या रनआऊटनंचर काहींनी ऑस्ट्रेलियन संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी, काहींनी हे योग्य असल्याचे सांगताना बेअरस्टोने लवकर क्रीज सोडणे ही चूक असल्याचे म्हटले. आता अश्विनने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी या रनआऊटबाबत वेस्ट इंडिजमधील बारटेंडर आणि वेटरसोबत झालेल्या वादाचा खुलासा केला आहे.
रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, आम्ही समुद्र किनाऱ्यावर बसलो होतो आणि त्याचवेळी राहुल भाई माझ्यासाठी लिंबाचा रस घेऊन तिथे आला. त्याने सांगितले की, बेअरस्टोच्या आऊटबाबत त्याने वेटर आणि बारटेंडरशी एक तास चर्चा केली. या वेळी नियम आणि खिलाडूवृत्तीसह प्रत्येक बाबींवर चर्चा झाली. ते सगळे खूप भावूकही झाले होते. दरम्यान, तिथे बसलेल्या एका वृद्ध व्यक्ती म्हणाला बेअरस्टो आऊट होता.
जॉनी बेअरस्टोच्या या विकेटबद्दल सांगायचे तर, कांगारू यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीचा चेंडू विकेटवर लागला, तेव्हा तो क्रीझच्या बाहेर होता. शॉर्ट पिच बॉल सोडल्यानंतर आऊट झालेल्या बेअरस्टोला वाटले की बॉल डेड झाला आहे. याबाबत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक माजी खेळाडूही क्रिकेट विश्वात आपापल्या संघाच्या बाजूने वक्तव्य करताना दिसले.
हेही वाचा – ICC Ranking: कसोटी क्रमवारीत मोठा बदल! बाबर आझमला फायदा तर स्टीव्ह स्मिथला झाला तोटा
तुम्ही क्रिकेटरसारखे दिसतात –
रविचंद्रन अश्विन म्हणाला, “आम्ही सगळे इथे जेवायला गेलो होतो. मी, दिलीप सर, राहुल द्रविड, विक्रम राठोड, आम्ही सगळे. त्यावेळी आम्ही एका रेस्टॉरंटजवळून गेलो. एक म्हातारा माणूस आला आणि त्याने कॅरिबियन उच्चारात आम्हाला विचारले, ‘तुम्हाला पेय आवडेल का? मग अचानक तो आम्हा सगळ्यांना ओळखू लागला आणि अतिशय उत्साहाने म्हणाला, ‘मी तुम्हाला ओळखतो. आपण कोणासारखे तरी दिसत आहात. तुम्ही क्रिकेटपटूसारखे दिसत आहात. तुम्ही अश्विन आहात. तुम्ही राहुल द्रविड आहात.”
अश्विनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे –
रविचंद्रन अश्विन यावेळी वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. या कसोटी मालिकेत अश्विनने आणखी तीन विकेट्स घेतल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरणार आहे.