India vs Bangladesh 1st Test 2nd Day Highlights: भारत वि बांगलादेशमधील पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या आहेत. यामध्ये यशस्वी जैस्वालचे अर्धशतक, जडेजा अश्विनची २०० अधिक धावांची भागीदारी, जडेजाच्या ८६ धावा तर अश्विनचे शतक आणि आकाशदीपच्या झटपट १७ धावांच्या खेळीसह बांगलादेशसमोर पहिल्या डावासाठी ३७६ धावांचे लक्ष्य दिले आहे. रविचंद्रन अश्विनने १३३ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांसह ११३ धावा करत बाद झाला. पहिल्याच दिवशी अश्विनने शतक झळकावले आणि शतकी कामगिरीनंतर त्याने एक खुलासा केला की त्याला आणि जडेजाला वीरेंद्र सेहवागने एक सल्ला दिला होता.

भारत-बांगलादेश कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सुरूवात फारच खराब झाली. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाच्या टॉप-३ फलंदाजांना स्वस्तात माघारी जावे लागले. बांगलादेशचा युवा गोलंदाज हसन महमूदने रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल यांना स्वस्तात बाद केलं, अशारितीने टीम इंडिया ३ बाद ३३ धावांवर खेळत होती. त्यानंतर ऋषभ पंत आणि जैस्वालने भारताला १०० पार नेले. १४४ धावांवर भारताने ६ विकेट गमावले होते.

हेही वाचा – ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने ‘बॅझबॉल’चा उडवला धुव्वा, विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम

१४४ धावांवर ६ विकेट अशी भारताची अवस्था असताना भारतात २०० धावाही न करत सर्वबाद होईल असे सर्वांना वाटत होते. पण त्यानंतर मैदानात आलेल्य रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या भारताच्या फिरकीपटू जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांना घाम फोडला. या दोघांनीही येताच आक्रमक पवित्रा घेत शानदार फटकेबाजी सुरू केली. आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अश्विनने विस्फोटक खेळी केली तर जडेजाने त्याला चांगली साथ दिली. पहिल्या दिवशी अश्विनने कसोटीमधील सहावे शतक झळकावले. यासह जडेजा आणि अश्विनने पहिल्या दिवशी १९५ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

हेही वाचा – Ravichandran Ashwin: “एक क्षण असा आला की मला…”, अश्विनने सांगितला मैदानातील संघर्ष; शतकाचं श्रेय जडेजाला देत म्हणाला…

सेहवागने अश्विन-जडेजाला दिलेला सल्ला

जडेजा-अश्विनच्या या खेळीनंतर शतकवीर अश्विन सामन्यानंतर बोलताना त्याने सांगितले की, “सेहवाग पाजींनी (वीरेंद्र सेहवाग) मला आणि जडेजाला जो सल्ला दिला त्याचा आम्हाला खूप फायदा झाला.” यावर रवी शास्त्रींनी विचारले, “काय सल्ला दिला होता.” यावर अश्विन म्हणाला, “त्यांनी सांगितले की हा बांगलादेश संघ आहे त्यांच्या दर्जाप्रमाणे खेळा आणि हसू लागतो.”

अश्विनने सहाव्या कसोटी शतकानंतर फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर ऋषभप पंतच्या खेळी कौतुक केले. तर जडेजाला त्याने आपल्या शतकाचे श्रेय देत मैदानात जडेजाने त्याला कशी मदत केली हेही सांगितले.

हेही वाचा –

IND vs BAN: बांगलादेश कसोटीत रोहित शर्माचा मास्ट्ररस्ट्रोक, तीन विकेट्स गमावल्यानंतरही भारताने कसा सावरला डाव?