R Ashwin said it would have been better to have played in the WTC final: ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतीय संघाला २०९ धावांनी निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता, तो रविचंद्रन अश्विनसारख्या कसोटीतील नंबर वन गोलंदाजाला संघात स्थान न मिळणे. अश्विनला स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पण आता स्वत: रविचंद्रन आश्विनने या प्रकरणावरील मौन सोडत आपली प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला खेळायचे होते –

आर अश्विनने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला या अंतिम सामन्यात नक्कीच खेळायचे होते. कारण संघाला इथे आणण्यात माझाही हातभार होता. गेल्या फायनलमध्येही मी चार विकेट घेतल्या होत्या. २०१८-१९ सालापासून परदेशातही माझी कामगिरी चांगली राहिली. मी खेळू शकलो नाही आणि आपण विजेतेपदही मिळवू शकलो नाही.”

मी या निर्णयाकडे प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या दृष्टिकोनातून पाहतोय –

अश्विन पुढे म्हणाला, “मी या निर्णयाकडे प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या दृष्टिकोनातून पाहत आहे आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. २०२१ मध्ये जेव्हा आम्ही इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा संघाने येथे फक्त चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज यशस्वी होईल असे ठरवले होते. त्यामुळे कदाचित सामना सुरू होण्याच्या ४८ तास आधी मला खेळण्याची संधी मिळणार नाही हे माहीत होते.”

हेही वाचा – MPL 2023: सलामीच्या सामन्यात पुणेरी बाप्पाचा कोल्हापूर टस्कर्सवर ८ विकेट्सने दणदणीत विजय, ऋतुराज गायकवाडचे वेगवान अर्धशतक

निवृत्ती घेईन तेव्हा मला पश्चाताप होईल –

अश्विनने सांगितले की, निवृत्तीनंतर त्याला एका गोष्टीचा पश्चाताप होईल. तो म्हणाला, “उद्या जेव्हा मी क्रिकेटला अलविदा म्हणेन, जेव्हा मी निवृत्ती घेईन तेव्हा मला पश्चाताप होईल की चांगला फलंदाज असूनही मी गोलंदाज बनायला नको होते. मी नेहमीच या गोष्टीशी लढत आलो आहे, फलंदाज आणि गोलंदाज यांना वेगळी वागणूक दिली जाते. दोन्हीसाठी स्केल नेहमीच पूर्णपणे भिन्न राहिले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin said it would have been better to have played in the wtc final 2023 vbm
Show comments