R Ashwin Statement First Statement: भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता भारतात परतला आहे. चेन्नईला पोहोचल्यावर अश्विनचे ​​जंगी स्वागत करण्यात आले. अश्विनच्या आई-वडिलांनी त्याचं जोरदार स्वागत केलं, यादरम्यान त्याचे आई-वडिल भावुक झालेले दिसले. अश्विनने चेन्नई विमानतळावर रिपोर्ट्सच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला होता, पण नंतर त्याच्या राहत्या घरी पोहोचल्यावर त्याने वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विन पत्रकारांशी बोलताना त्याच्या निवृत्तीवर पहिल्यांदा भाष्य करताना म्हणाला, मी आयपीएलमध्ये CSKकडून खेळणार आहे आणि मी फार काळ खेळण्याचा प्रयत्न केला तर आश्चर्य वाटायला नको. अश्विनमधील एक क्रिकेटपटू अजूनही तसाच आहे, भारतीय क्रिकेटपटू म्हणून अश्विनची कारकीर्द संपवण्याची वेळ आली आहे, इतकंच.

हेही वाचा – R Ashwin: अश्विनचं निवृत्तीनंतर भारतात परतताच जंगी स्वागत, चेन्नईतील घरी पोहोचताच आई-वडिल झाले भावुक; पाहा VIDEO

निवृत्ती जाहीर करणं हा अवघड निर्णय होता का, असे त्यांना विचारले असता तो म्हणाला- नाही असं काही नाहीय. काही लोकांहे ऐकून भावूक झाले आहे. साहजिकच निवृत्ती जाहीर करणं हे भावुक करणार आहे. पण माझ्यासाठी ही खूप समाधानाची भावना आहे. गेल्या काही काळापासून निवृत्तीचा विचार माझ्या मनात होता. पण मी अचानक मला गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी वाटलं आणि मी पाचव्या दिवशी निवृत्ती जाहीर केली.

हेही वाचा – WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण?

अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर करताच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींच्या मते परदेशातील कसोटी सामन्यात कमी संधी मिळाल्यामुळे त्याने निराश होत हा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. पण अश्विनने या अफवा फेटाळून लावल्या. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, मला अजिबातच कसला पश्चात्ताप नाही. मी बऱ्याच जणांना पश्चात्ताप करताना पाहिलं आहे. पण मला माझं आयुष्य तसं जगायचं नाही.

हेही वाचा – R Ashwin Net Worth: ९ कोटींचं घर, मीडिया कंपनी, लग्झरी कार…, १०० कोटींपेक्षा जास्त आहे अश्विनची एकूण संपत्ती

अश्विनच्या स्वागतासाठी जमलेली गर्दी पाहून अश्विन भावुक झाला. या सर्वांचे आभार मानत तो म्हणाला, सर्वांचे खूप खूप आभार. मला वाटलं नव्हतं की इतके लोक असतील. मला वाटलं होतं मी शांतपणे घरी जाईन, पण तुम्हा सर्वांची उपस्थितीमुळे मला बरं वाटलं. अशी गर्दी जेव्हा मी २०११ चा विश्वचषक विदयानंतर घरी आलो होतो, तेव्हा पाहिली होती. त्या सर्व आठवणी पुन्हा आठवल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwin statement after retirement said i have zero regrets want to play for csk as long as possible bdg