R Ashwin Top 15 Records and Milestones in Test Cricket: रवीचंद्रन अश्विनने भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू आणि तितकाच उत्तम फलंदाज म्हणून त्याने ओळख निर्माण केली. २०१० मध्ये भारतासाठी वनडे आणि टी-२० मध्ये तर २०११ साली कसोटीत पदार्पण करत १८ डिसेंबर २०२४ मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या क्रिकेट कारकीर्दीत एकापेक्षा एक असे १५ खास विक्रम केले आहेत, त्यांचा आढावा.

७६५- रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पटकावलेल्या विकेट्सची संख्या. सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे यांच्यांनंतर अश्विनचं नाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन ११व्या स्थानी.

Ravichandran Ashwin Retirement after Gaaba Test
R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती, गाबा कसोटीनंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
What made Ravichandran Ashwin retire in the middle of the Border Gavaskar series
R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा का केली?
Rohit Sharma Statement on R Ashwin Retirement Said convinced him to stay for the pink ball Test
Rohit Sharma on R Ashwin Retirement: “मी त्याला पिंक-बॉल कसोटीपर्यंत थांबण्याची विनंती केली…”, रोहित शर्माने अश्विनच्या निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा
pm narendra modi on amit shah dr babasaheb ambedkar congress
अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!
Jasprit Bumrah Breaks Kapil Dev Record and Becomes Most Wicket Taker in Australia for India IND vs AUS Gabba
IND vs AUS: जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये घडवला इतिहास, कपिल देवला मागे टाकत ठरला नंबर वन
Akashdeep Irritates Travis Head by Putting Ball Down Which Stuck in his pad later says sorry Video
IND vs AUS: “सॉरी सॉरी…”, आकाशदीपने आधी हेडला खाली वाकून उचलायला लावला चेंडू, मग मागितली माफी; पाहा VIDEO
Eknath Shinde
“आज याला भेट, त्याला भेट, दुसऱ्या दिवशी…”, उद्धव ठाकरे-फडणवीस भेटीवरून एकनाथ शिंदेंची शेलक्या शब्दांत टीका

५३७- अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये पटकावलेल्या विकेट्सची संख्या. भारतीय गोलंदाजांतर्फे सर्वाधिक विकेट्सच्या यादीत अनिल कुंबळे यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी.

१- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत १०० विकेट्स पटकावणारा पहिलावहिला गोलंदाज. मार्च २०२२ मध्ये अश्विनने हा विक्रम नावावर केला.

१९५- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे.

३७– कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने एका डावात ५ विकेट्स घेण्याची करामत ३७ वेळा केली आहे. यापेक्षा डावात ५ विकेट्स पटकावण्याची किमया मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर.

हेही वाचा – R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती, गाबा कसोटीनंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का

२- सगळ्यात कमी कसोटी सामन्यांमध्ये ५०० विकेट्स पटकावणारा गोलंदाज. ९८ कसोटीत अश्विनने हा विक्रम केला. २५०, ३००, ३५० विकेट्सचा टप्पा विक्रमी कसोटीत ओलांडणारा गोलंदाज

११- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्काराने सन्मानित.

२२६- कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्रिफळाचीत आणि पायचीत केलेल्या फलंदाजांची संख्या.

३०२- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००हून अधिक वेळा फलंदाजांना पायचीत टिपणारा केवळ तिसरा गोलंदाज. मुथय्या मुरलीधरन (३३६) आणि जेम्स अँडरसन (३२०) हे दोघे या यादीत पुढे.

हेही वाचा – Rohit Sharma on R Ashwin Retirement: “मी त्याला पिंक-बॉल कसोटीपर्यंत थांबण्याची विनंती केली…”, रोहित शर्माने अश्विनच्या निवृत्तीबाबत केला मोठा खुलासा

४- एका कसोटीत शतक आणि डावात ५ विकेट्स घेण्याची किमया अश्विनने ४ वेळा साधली. इंग्लंडचे इयन बोथम या यादीत अग्रणी.

१५६- वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत अश्विन चौथ्या स्थानी

३८३- भारतात कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने पटकावलेल्या विकेट्सची संख्या.

४७५- भारतात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अश्विनने पटकावलेल्या विकेट्सची संख्या. या यादीत अनिल कुंबळेंपाठोपाठ दुसऱ्या स्थानी

हेही वाचा – R Ashwin Retirement: रवीचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यात निवृत्तीची घोषणा का केली?

३८- डावात पाच विकेट्स पटकावणारा भारताचा सगळ्यात वयस्क खेळाडू. सप्टेंबर २०२४ मध्ये अश्विनने चेन्नई इथे बांगलादेशविरुद्ध ६ विकेट्स घेतल्या होत्या.

४६- भारतात कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना अश्विनचा स्ट्राईकरेट. मायदेशात २०० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स पटकावणाऱ्या फिरकीपटूंमध्ये सर्वोत्तम स्ट्राईक रेट.

Story img Loader