R Ashwin Wife Prithi Pens Emotional Post : राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत भारताने इंग्लंडचा ४३४ धावांना पराभव करत ऐतिहास विजय नोंदवला. या सामन्यात भारताकडून रविचंद्रन अश्विनने ५०० विकेट्सचा पल्ला पार केला. त्याने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रविवारी मैदानात परतून टीम इंडियाच्या विजयात योगदान दिले. त्तत्पूर्वी तिसऱ्या दिवसाच्या खेळाला उपस्थित नव्हता. तो आपल्या घरी परतला होता. आता त्याच्या पत्नीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही तो सहभागी झाला होता, मात्र त्यानंतर कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे त्याला घरी परतावे लागले. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो चेन्नईला परतला असल्याने शनिवारी अश्विन मैदानावर दिसला नाही. मात्र, तो रविवारी राजकोटला परतला आणि त्याने ५०१वी कसोटी विकेट घेतली. आता त्याची पत्नी प्रीतीने या कामगिरीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अश्विन आणि त्याच्या कुटुंबासाठी आपत्कालीन परिस्थिती कशामुळे आली हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही, कारण बीसीसीआयने प्रत्येकाला गोपनीयतेचे आवाहन केले आहे. मात्र, बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपल्या पोस्टमध्ये अश्विनच्या आईची प्रकृती ढासळत असल्याचे म्हटले होते. आता प्रितीने त्या परिस्थितीचे गांभीर्य व्यक्त केले आहे. ती म्हणाली की ४८ तास हे त्याच्या कुटुंबासाठी सर्वात मोठे आणि कठीण होते.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : जसप्रीत बुमराह रांची कसोटीचा भाग असणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण?

प्रीतीने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘आम्ही हैदराबादमध्ये ५०० विकेट्सची वाट पाहिली, पण मिळाली नाही. यानंतर विशाखापट्टणममध्येही वाट पाहिली, पण तिथेही निराशा झाली. म्हणून मी भरपूर मिठाई विकत घेतली आणि जेव्हा ४९९ विकेट्स होत्या, तेव्हा मी त्या प्रत्येकाला घरी वाटल्या. ५०० विकेट्स पूर्ण केल्याचे कोणतेही खास सेलिब्रेशन नव्हते. तो दिवस असा शांतपणे गेला, जणू काही घडलेच नाही. ५०० ते ५०१ विकेट दरम्यान बरेच काही घडले. हे आमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि कठीण ४८ तास होते.”

प्रीतीने पुढे लिहले, ‘पण ही पोस्ट ५०० व्या विकेट्सबद्दल आणि त्यापूर्वीच्या ४९९ व्या विकेट्सबद्दल आहे. हा खूप मोठा पराक्रम आहे. अश्विन, तुम्ही किती अप्रतिम खेळाडू आहात. मला तुमचा अभिमान आहे. आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो!’ बीसीसीआयने रविवारी एका प्रसिद्धीपत्रकात पुष्टी केली होती की, अश्विन रविवारी राजकोटमध्ये त्याच्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा सामील होण्यासाठी उपलब्ध असेल. चौथ्या दिवशी चहापानानंतर अश्विन मैदानात परतला. त्याने टॉम हार्टलीला बाद करून आपली ५०१वी विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल

दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी अश्विनला वेळेत राजकोटला पोहोचण्यासाठी बीसीसीआयने चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था केली होती. सततच्या प्रवासामुळे कौटुंबिक कठीण परिस्थिती आणि मानसिक थकवा असतानाही अश्विनने हार मानली नाही आणि चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या विजयात योगदान दिले. त्याने सहा षटके टाकली आणि १९ धावांत एक गडी बाद केला. अश्विन आता २३ फेब्रुवारीपासून रांची येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत दिसणार आहे.

Story img Loader