Ravichandran Ashwin on Asia Cup: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी सर्वांना आश्चर्यचकित करणारे विधान केले आहे. त्याच्यामते, “बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या आगमनाने पाकिस्तान खूप मजबूत झाला आहे. आगामी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान हा दुसऱ्या संघासाठी धोकादायक ठरू शकतो. येणाऱ्या काळात पाकिस्तान हा एक महान संघ होईल,” असा विश्वास आर अश्विनने व्यक्त केला आहे. त्याआधी आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी कॅंडी येथे होणार आहे, ज्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अश्विन आणखी काय म्हणाला, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “मला पाकिस्तान संघाचा हेवा वाटत आहे. ५-६ वर्षांपूर्वी आशिया कप आणि विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो संघर्ष करत असे. होय, अर्थातच, त्याने यापूर्वी मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी १९९२ मध्ये विजय जिंकला होता. चॅम्पियन्सट्रॉफी आणि टी२० विश्वचषकात सातत्याने चांगली कामगिरी केली. मात्र, तरीही ते अंडरडॉग म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या ५-६ वर्षांत त्यांच्या संघात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या येण्याने आमुलाग्र बदल झाला आहे.”

वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा पाकिस्तानचा अनुभव आहे- अश्विन

“अश्विनने पाकिस्तान संघ वेगवेगळ्या परिस्थितीत खेळला म्हणून हा बदल घडला.” असे म्हणत या अनुभवाचे श्रेय देखील दिले. तो पुढे म्हणाला की, “हे सर्व त्यांच्या संघाच्या डेप्थवर अवलंबून आहे. पाकिस्तानने नेहमीच अपवादात्मक क्रिकेटपटू तयार केले आहेत. टॅप बॉल क्रिकेटमुळे त्यांच्याकडे नेहमीच वेगवान गोलंदाज होते. १९९० आणि २०००च्या दशकाच्या उत्तरार्धात त्याची फलंदाजी खास होती. पण गेल्या ५-६ वर्षांतील त्याची वेगवेगळ्या लीगमधील कामगिरी हे त्यांच्या पुन्हा उदयास येण्याचे प्रमुख कारण आहे. त्यांच्याकडे पीएसएल आहे. नुकत्याच झालेल्या BBL लीगमध्ये ते किमान ६०-७० पाकिस्तानी खेळाडू होते.”

हेही वाचा: PAK vs NEP: अवघ्या २३.४ षटकात नेपाळचा खुर्दा; आशिया चषकात पाकिस्तानची विजयी सलामी, तब्बल २३८ धावांनी दणदणीत विजय

अश्विनने पुढे सांगितले की, “ते कसोटी क्रिकेट खेळत बरोबरच स्वतःची टी२० लीगही खेळत आहेत. तसेच, ते जगभर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही खेळत आहेत. यावर्षीच्या सीपीएलमध्ये फारसे पाकिस्तानी खेळाडू नाहीत पण ते नेहमीच सीपीएलमध्ये वर्चस्व गाजवतात. ते एमिरेट्स लीग, यूएसए आणि कॅनडामध्येही खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू तयार होतात आणि नवीन टॅलेंटला संधी मिळते.”

अश्विन पुढे म्हणाला की, “आयपीएलमध्ये आम्ही टॅलेंटला संधी मिळेल याची काळजी घेतो आणि त्यामुळेच आम्हाला विविध क्षेत्रातील अधिक क्रिकेटपटू दिसत आहेत. तसेच, त्यांनी केल्याने गेल्या ५-६ वर्षांत पाकिस्तान केवळ जागतिक दर्जाचे क्रिकेटपटूच निर्माण करत नाही, तर हे प्रतिभावंत खेळाडू निर्माण करत असून ते मोठ्या टूर्नामेंटमध्ये कामगिरी करत आहेत.”

हेही वाचा: IND vs PAK Head-to-Head: सहा वर्षांपासून वन डे क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध अपराजित, ‘हा’ आहे आशिया कपमधील विक्रम

आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान एक उत्कृष्ट संघ असेल- अश्विन

व्हिडीओमध्ये अश्विनने पाकिस्तानचा कर्णधार आणि यष्टीरक्षकाविषयी सांगितले की, “जर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी मधल्या फळीत फलंदाजी करत चांगली कामगिरी केली तर पाकिस्तान या आशिया कप आणि विश्वचषकात एक उत्कृष्ट संघ असेल. पाकिस्तान हा असाधारण संघ आहे. यंदा आशिया चषकाचे बहुतांश सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. श्रीलंकेच्या परिस्थितीचा अनुभव पाकिस्तानपेक्षा कोणाला अधिक असणार? कारण लंका प्रीमियर लीगमधील जवळपास सर्व परदेशी पाकिस्तानी होते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R ashwins big claim said pakistan will become a great team in asia cup and world cup avw
Show comments