Rachin Ravindra World Record: आयसीसी टूर्नामेंट आणि रचिन रवींद्रचे शतक यांचं जणू समीकरणचं झालं आहे. रचिन रवींद्रला आयसीसी स्पर्धेतील सामन्यांमध्ये शतकं झळकावण्याची त्याला सवयच झाली आहे, असं त्याच्या रेकॉर्डवर दिसून येत आहे. न्यूझीलंडच्या या डावखुऱ्या फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत शानदार शतक झळकावले. रचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या शतकासह त्याने विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
रचिन रवींद्रने १०१ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकारासह १०८ धावांची शानदार खेळी केली. यासह त्याने वनडेमध्ये हे पाचवे शतक केले आहे. ही सर्व शतकं त्याने आयसीसी स्पर्धेत केली आहेत. रचिन रवींद्रने आयसीसी टूर्नामेंटमध्ये 5 शतके झळकावली आहेत आणि त्याने हा पराक्रम सर्वात कमी डावात केला आहे.
रचिन रवींद्रने केवळ १३ डावात ५ शतकं झळकावली आहेत. मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ पाच शतकं आहेत आणि ती सर्व त्याने विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झळकावली आहेत. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ३ शतकं केली होती आणि आता या फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २ शतकं झळकावली आहेत.
आयसीसी स्पर्धेत सर्वात जलद ५ शतकं करणारे खेळाडू
रचिन रवींद्र – १३ डावांमध्ये
शिखर धवन – १५ डावांमध्ये
हर्शेल गिब्स – २० डावांमध्ये
सौरव गांगुली – २० डावांमध्ये
सईद अन्वर – २४ डावांमध्ये
रोहित शर्मा – २४ डावांमध्ये
केवळ सचिन तेंडुलकर आणि रचिन रवींद्र यांनी वयाच्या ३०व्या वर्षापूर्वी आयसीसी वनडेमध्ये सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. दोघांनी ५-५ शतकं केली आहेत.
२५ आणि त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंनी ICC स्पर्धांमध्ये सर्वाधिक ५० अधिक केलेल्या धावसंख्या
सचिन तेंडुलकर – ९ वेळा
रचिन रवींद्र – ७ वेळा*
जॅक कॅलिस – ६ वेळा
उपुल थरंगा – ६ वेळा
एबी डिव्हिलियर्स – ५ वेळा
रचिन रवींद्रने या संघांविरुद्ध वनडेमध्ये शतकं झळकावली
१०८ धावा – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (चॅम्पियन्स ट्रॉफी)
११२ धावा – बांगलादेशविरुद्ध (चॅम्पियन्स ट्रॉफी)
१०८ धावा – पाकिस्तानविरुद्ध (विश्वचषक)
११६ धावा – ऑस्ट्रेलियाविरुद्ध (विश्वचषक)
१२३ धावा* – इंग्लंडविरुद्ध (विश्वचषक)