Rachin Ravindra broke Yashasvi Jaiswal record : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आपली छाप पाडणारा युवा फलंदाज रचिन रवींद्रने पहिल्या डावातच द्विशतक झळकावले. कारकिर्दीतील चौथा सामना खेळत असलेल्या रचिनने ३६६ चेंडूत २४० धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. रचिन रवींद्रच्या या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात ५११ धावा करता आल्या. तसेच, रचिन रवींद्रच्या या द्विशतकानंतर त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ वर्षीय रचिन रवींद्रची ऐतिहासिक खेळी –

रचिन रवींद्रने कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. यादरम्यान त्याने २६ चौकार आणि ३ षटकार मारले. रचिन रवींद्रने कसोटीत १०० धावांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्याचे दुहेरी शतकात रूपांतर करण्यातही त्याला यश आले. आपल्या पहिल्या कसोटी शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर करणारा रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा चौथा खेळाडू ठरला. याआधी न्यूझीलंडचे केवळ ३ खेळाडू ही कामगिरी करू शकले होते.

डब्ल्यूटीसी २०२३-२५ ​​मधील सर्वात मोठी इनिंग खेळली –

रचिन रवींद्रने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​सायकलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. रचिन रवींद्रने २४० धावांची खेळी करत यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडला. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या विशाखापट्टणम कसोटी सामन्यात त्याने २०९ धावांची खेळी खेळली, जी २०२३-२५ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील सर्वोच्च खेळी होती.

हेही वाचा – IND vs ENG : जेम्स अँडरसनने टीम इंडियाची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘किती मोठे लक्ष्य पुरेसे असेल हे भारताला…’

रचिन कसोटीत द्विशतक झळकावणारा न्यूझीलंडचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. याआधी केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर होता. न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वात कमी वयात द्विशतक झळकावण्याचा विक्रम मॅथ्यू सिंक्लेअरच्या नावावर आहे. सिंक्लेअरने १९९९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावले होते.

हेही वाचा – IND vs ENG : अश्विनच्या चेंडूवर रोहित शर्माने घेतला पोपचा उत्कृष्ट झेल, फलंदाजही झाला चकीत, पाहा VIDEO

मॅथ्यू सिंक्लेअरने वेस्ट इंडिजविरुद्ध २१४ धावा केल्या होत्या. आपल्या पहिल्या कसोटी शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर करणारा रचिन हा न्यूझीलंडचा चौथा फलंदाज आहे. तसेच, कसोटीच्या पहिल्या डावात सर्वाधिक २४० धावा करणारा रचिन रवींद्र आता न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरलाआहे. ज्याने पहिल्या डावात सर्वात मोठी खेळी साकारली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rachin ravindra broke yashasvi jaiswal record by scoring a double century against south africa in test vbm
Show comments