Rachin Ravindra Injury Update in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिकेचे आयोजन केले गेले आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सहभागी झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तिन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला गेला. न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला असला तरी रचिन रवींद्रच्या गंभीर दुखापतीमुळे संघ मोठा चिंतेत होता. आता रचिनच्या दुखापतीबाबत न्यूझीलंड क्रिकेट संघाने अपडेट दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र शनिवारी पाकिस्तान विरुद्धच्या तिरंगी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला होता. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना चेंडू जाऊन रचिनच्या कपाळावर जाऊन आदळला आणि रक्ताच्या धारा वाहू लागल्या. यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.

सामन्यातील ३८ व्या षटकात मायकेल ब्रेसवेल गोलंदाजी करत होता. क्षेत्ररक्षण करताना चेंडू टिपण्याचा प्रयत्न करत होता. फ्लडलाइट्समुळे चेंडू त्याच्या नजरेतून सुटला आणि तो थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळला. यानंतर रचिनच्या कपाळातून रक्त वाहू लागले आणि त्याला तात्काळ मैदानाबाहेर काढण्यात आले.

न्यूझीलंड क्रिकेटच्या निवेदनात म्हटले आहे की, ३८व्या षटकात झेल घेताना चेंडू कपाळावर लागल्याने रवींद्रला मैदान सोडावे लागले. त्याच्या कपाळाला जखम झाली असून, त्याच्यावर मैदानावर उपचार करण्यात आले आणि तिथेच त्याला टाकेही घालण्यात आले. आता तो ठिक आहे आणि HIA प्रोटोकॉलअंतर्गत त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात रचिन खेळू शकणार नाही.

रचिन रवींद्रच्या दुखापतीच्या व्हीडिओ (Rachin Ravindra Injured Video)

लॉकी फर्ग्युसनच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे न्यूझीलंड आधीच चिंतेत आहे. आता रचिनची दुखापतही संघासाठी टेन्शनची गोष्ट ठरली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल आणि लवकरच संघासाठी मैदानावर अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी तोंडावर आलेली असताना अनेक संघांना दुखापतीमुळे संघात मोठे बदल करावे लागले आहेत. त्यामुळे रचिन दुखापतीमुळे संघाबाहेर असणंस किवी संघासाठी धक्का देणारं असेल, कारण आशियाई परिस्थितीत त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण असणार आहे.