Rachin Ravindra’s First Test Century : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील पहिला सामना माऊंट मानुगनई येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार युवा फलंदाज रचिन रवींद्रने शानदार खेळी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. रचिनच्या या खेळीने चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांनाही आनंद झाला. वास्तविक, तो आयपीएल २०२४ मध्ये या सीएसके फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रचिन रवींद्रने झळकावले पहिले कसोटी शतक –

आपल्या चौथ्या कसोटी सामन्यात रचिन रवींद्र किवी संघाने पहिल्या दोन विकेट केवळ ३९ धावांवर गमावल्यानंतर फलंदाजीला आला. येथून त्याने अनुभवी फलंदाज केन विल्यमसनसह किवी डावाची धुरा सांभाळली आणि कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रचिन रवींद्रने नाबाद २११ चेंडूत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ११८ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने दोन गडी गमावून २५८ धावा केल्या होत्या.

विश्वचषक २०२३ पासून चमकले रचिनचे नशीब –

रचिन रवींद्रच्या कारकिर्दीत २०२३ च्या विश्वचषकाने महत्त्वाची भूमिका बजावली. दुखापतग्रस्त केन विल्यमसनच्या जागी किवी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या रचिनने संपूर्ण विश्वचषकात बॅटने एकामागून एक अनेक अप्रतिम खेळी खेळल्या. त्याने विश्वचषकात तीन शतके झळकावत एकूण ५७८ धावा केल्या.

हेही वाचा – BPL 2024 : खुलना टायगर्सविरुद्ध शोएब मलिकने अष्टपैलू कामगिरी करत टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

त्याच्या विश्वचषकातील कामगिरीनंतर चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्सने त्याला आयपीएल २०२४ च्या लिलावात आपल्या संघात सामील केले. रचिनची अजूनही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या या फलंदाजाला पाहून खूप आनंद होईल. आयपीएल २०२४ मध्येही रचिनची बॅट अशीच कामगिरी करत राहावी, अशी आशा सीएसकेला असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rachin ravindra scored his maiden test century in the first match against south africa vbm