गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोनॅकोचा आक्रमणवीर रॅडामेल फाल्काओने फिफा विश्वचषकासाठीच्या कोलंबिया संघातून माघार घेतली आहे, अशी माहिती प्रशिक्षक जोस पीकरमॅन यांनी पत्रकार परिषदेत दिली. जानेवारी महिन्यात फाल्काओच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. विश्वचषकापर्यंत तो बरा होईल, अशी संघव्यवस्थापनाला अपेक्षा होती, पण ती फोल ठरली.
कोलंबियाचा संघ –
गोलरक्षक : डेव्हिड ओस्पिना, फॅरिड मोन्ड्रॅगन, कॅमिलो व्हर्गस. बचावपटू : कॅमिलो झुनिगा, सांतियागो एरियस, मारिओ अल्बटरे येपेस, ख्रिस्टियन झपाटा, पाबलो आर्मेरो, एडर अल्वारेझ बालंटा, कार्लोस व्हाल्डेस. मध्यरक्षक : अॅलेक्स मेजिया, फ्रेडी ग्युआरिन, अॅबेल अॅग्युलर, अॅल्डो लीओ रॅमिरेझ, कार्लोस सांचेझ, ज्युआन क्विंटेरो, ज्युआन क्युआड्रॅडो, जेम्स रॉड्रिगझ. आघाडीपटू : कार्लोस बाका, टॉफिलो ग्युटेरेझ, जॅकसन मार्टिनेझ, व्हॅक्टर इबाबरे, अॅड्रियन रामोस.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा