Radha Yadav taking amazing catch video viral in IND vs NZ : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. त्याचबरोबर पाहुण्या संघाने सलग पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंतच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. दुसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा ७६ धावांनी पराभव केला. दरम्यान या सामन्यात भारताच्या राधा यादवने उत्कृष्ट झेल घेतला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने जरी हा सामना हरला असला, तरी पण संघाची स्टार खेळाडू राधा यादवने या सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीची छाप सोडली. तिने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली. उल्लेखणीय म्हणजे राधाने या सामन्यात दोन उत्कृष्ट झेल टिपले. विशेष म्हणजे त्यातील एक झेल खूपच खास होता. जो तिने हवेत उडत अप्रतिम झेल टिपला, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या झेलची सर्वत्र चर्चा आहे. त्याचबरोबर चाहतेही तिच्या शानदार क्षेत्ररक्षणाचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

राधा यादवने हवेत डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला –

वास्तविक, या सामन्यात प्रिया मिश्रा भारतीय संघाच्या वतीने न्यूझीलंड महिला संघाच्या डावातील ३२ वे षटक टाकत होती. तिच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ब्रुक हॅलिडे स्ट्राइकवर होती. तिने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तिचा प्रयत्न फसला आणि चेंडू दूर जाण्याऐवजी फक्त मैदानातच दूर गेला. अशा स्थितीत राधा यादव चेंडूचा अंदाज घेत मागे उलट धावत गेली. ती चेंडूपासून थोडी दूर होती. त्यामुळे तिने जबरदस्त हवेत डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. बीसीसीआयनेही तिच्या या शानदार झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – IND vs AUS : ‘मोहम्मद शमीची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का पण…’, ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचे वक्तव्य

u

राधा यादवने ४ विकेट्स घेत फलंदाजीतही योगदान दिले –

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत किवी संघाने ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या होत्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तिने कर्णधार सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स, मॅडी ग्रीन आणि ली ताहुहू यांना बाद केले. याशिवाय तिने फलंदाजीतही योगदान दिले. राधाने ६१ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४५ धावांची खेळी साकारली. या खेळीत तिने ५ चौकार मारले.