कार्लो अँसेलोटी यांच्या हकालपट्टीनंतर रिअल माद्रिद क्लबच्या प्रशिक्षकपदाची धुरा कोणाकडे सोपविण्यात येईल यावर अनेक चर्चा रंगल्या. त्यात राफेल बेनिटेझ यांचे नाव आघाडीवर होते आणि रविवारी माद्रिदचे उपाध्यक्ष एडुआडरे फर्नाडेझ डे ब्लास यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून बेनिटेझ यांच्या नावाचा उल्लेख करताना ब्लास यांनी प्रशिक्षकपदासाठी त्यांची नियुक्ती करण्याचा माद्रिदचा हेतू असल्याचे सांगितले.अँसेलोटी यांच्या कारकीर्दीवर नाराजी व्यक्त करताना माद्रिदने त्यांना पदावरून हटविले होते. त्याच दरम्यान बेनिटेझ यांचे नाव पुढे आले. नापोली क्लबच्या प्रशिक्षकपदावर असलेल्या बेनिटेझ यांनी गेल्या आठवडय़ात पदाचा राजीनामा दिल्याने या चर्चेला पाठबळ मिळाले.

Story img Loader