Rafael Nadal Retirement From Tennis with Emotional Video: टेनिसपटू राफेल नदालने आपल्या करिअरला अखेरचा निरोप दिला आहे. या दिग्गज खेळाडूने गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. या व्हीडिओमध्ये बोलताना राफेलचे डोळेही पाणावले.

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने निवृत्तीची घोषणा केली आहे, ज्याने सर्वच टेनिस चाहत्यांना एक धक्का बसला आहे. त्याने आपल्या शानदार कारकिर्दीत २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालागा येथे होणारी डेव्हिस कप फायनल नदालची शेवटची स्पर्धा असेल. या वर्षाच्या सुरुवातीला पॅरिस ऑलिम्पिकनंतर तो एकही सामना खेळलेला नाही. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान डेव्हिस कप फायनलमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. दुखापतीमुळे ग्रुप स्टेजला मुकल्यानंतर नदालचा संघात समावेश करण्यात आला होता.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
ajit-pawar on sharad pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : “ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
suraj chavan instagram account facing technical issue important post delete he apologize
सूरज चव्हाणने मागितली चाहत्यांची माफी! काय आहे कारण? अंकिता व जान्हवी यांचा उल्लेख करत म्हणाला…
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”

हेही वाचा – Harry Brook Triple Century: मुलतान का नया सुलतान! हॅरी ब्रुकने झळकावले कसोटीतील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक, वीरेंद्र सेहवागचा महाविक्रमही मोडला

राफेल नदालने व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना डेव्हिस कप फायनल असेल. ही तीच स्पर्धा आहे जिथून त्याने २००४ मध्ये यशस्वी कारकिर्दीला सुरुवात केली होती. राफेल नदालने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने सांगितले की, गेली दोन वर्षे त्याच्यासाठी खूप कठीण गेली आहेत. यादरम्यान आपली १०० टक्के कामगिरी करू शकला नाही आणि म्हणूनच तो हा कठीण निर्णय घेत आहे. नदालने १२ भाषांमध्ये पोस्टच्या कॅप्शनमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – Ratan Tata Death: टाटा समूहाने ‘या’ क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला दिला आकार, सुनील गावसकर, रवी शास्त्री ते युवराज सिंग आणि शार्दुल ठाकूर

आपल्या कारकिर्दीत नदालला साथ देणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले. आपल्या कारकिर्दीचा बराच काळ ज्यांच्यासोबत घालवला त्या प्रतिस्पर्ध्यांचेही त्याने आभार मानले. नदालने रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचसोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने आपल्या आईचेही आभार मानले. आईच्या त्यागामुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो, असे नदालने सांगितले. १९ वर्षांपासून त्यांच्याबरोबर असलेल्या पत्नी मेरीचेही त्यांनी आभार मानले. नदालच्या मते, त्याच्या काकांनी त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली ज्यामुळे त्याने टेनिस खेळायला सुरुवात केली.

हेही वाचा – Ratan Tata Death: रतन टाटा आणि सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ भेटीचा फोटो होतोय व्हायरल, सचिनने निधनानंतर राहत्या घरी जाऊन घेतलं अंत्यदर्शन

Rafael Nadal Retirement: गोल्डन स्लॅम जिंकणाऱ्या तीन खेळाडूंमध्ये राफेल नदालचा समावेश

राफेल नदालने आपल्या कारकिर्दीत २२ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये १२ फ्रेंच ओपन, दोन ऑस्ट्रेलियन ओपन, दोन विम्बल्डन आणि चार यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकले आहे. २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरी प्रकारात सुवर्णपदक आणि २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. इतकेच नाही तर २००४, २००९, २०११ आणि २०१९ मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही नदाल भाग होता.

जगातील फक्त तीन खेळाडू आहेत ज्यांनी गोल्डन स्लॅम जिंकले आहेत. त्यांच्यामध्ये राफेल नदालच्या नावाच्या समावेश होतो. गोल्डन स्लॅम म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू एका कॅलेंडर वर्षात चार ग्रँडस्लॅम जिंकतो आणि त्याच वर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो. त्याने ९२ एटीपी एकेरी विजेतेपद जिंकले आहेत, त्यापैकी ६३ त्याने लाल मातीच्या कोर्टवर जिंकली आहेत.