विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम पुरुष एकेरी विजेतेपद जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. क्वार्टरफायनलमध्ये रंगलेल्या सामन्यात नदालने डेनिस शापोवालोव्हचा पराभव केला. नदाल, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांच्याकडे पुरुष एकेरीची २० विजेतेपदे आहेत. फेडरर आणि जोकोविच ऑस्ट्रेलियन ही स्पर्धा खेळत नाहीत.

शापोवालोव्हने नदालला ५ सेट आणि ४ तास झुंजवले. नदालने शापोवालोव्हला ६-३, ६-४, ४-६, ३-६, ६-३ असे हरवले आणि सातव्यांदा या स्पर्धेची सेमीफायनल गाठली. पहिल्या दोन सेटमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर पोटदुखीमुळे तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये नदालची लय तुटली, मात्र निर्णायक सेट जिंकून त्याने शेवटच्या-4मध्ये धडक मारली.

हेही वाचा – भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला मिळणार अजून एक पदक; प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान!

राफेल नदालने २००९ मध्ये फक्त एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे आणि गेल्या १३ पैकी ७ उपांत्यपूर्व फेरीत नदालला पराभव पत्करावा लागला आहे. आता शुक्रवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. सातव्या मानांकित मॅटिओ बेरेटिनी किंवा १७व्या मानांकित गेल मॉन्फिल्सशी यांच्याशी नदाल झुंजणार आहे.

Story img Loader