लाल मातीचा बादशाह राफेल नदालने मोठा निर्णय घेतला आहे. स्पेनचा महान टेनिसपटू नदालने पायाच्या दुखापतीमुळे २०२१चा हंगाम संपण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की नदाल यूएस ओपनमध्ये खेळणार नाही. २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या नदाललला गेल्या आठवड्यात सिनसिनाटी मास्टर्स आणि कॅनेडियन ओपनमधून बाहेर पडावे लागले.
गतविजेता डॉमिनिक थीम आणि पाचवेळा विजेता रॉजर फेडररनेही यंदाच्या यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. ३५ वर्षीय नदालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणाला, ”खरं सांगू, एका वर्षापासून मी माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल खूप चिंतित आहे आणि मला थोडा वेळ हवा आहे.”
View this post on Instagram
हेही वाचा – अँडरसननं अश्विनचा फोटो घेतला अन्…; लॉर्ड्स कसोटीनंतर जुना VIDEO होतोय व्हायरल
तो पुढे म्हणाला, ”टीम आणि कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. माझा विश्वास आहे की दुखापतीतून सावरण्याचा हा मार्ग आहे. आत्तासाठी, मी स्वत: वर अजून मेहनग घेणार आहे. माझा असा विश्वास आहे, की पायाची दुखापत बरी होऊ शकते. दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी मी शक्य तितकी मेहनत घेईन.”
Thinking of you, @RafaelNadal
Rafa has called time on his 2021 ATP Tour season, recovering from a foot injury.
We can’t wait to see you in 2022, Rafa! pic.twitter.com/bDkAvWLgCB
— ATP Tour (@atptour) August 20, 2021
चार वेळा यूएस ओपन चॅम्पियन नदालने विम्बल्डन आणि ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. जूनमध्ये फ्रेंच ओपन दरम्यान त्याला दुखापत झाली होती. फ्रेंच ओपनमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने राफेल नदालला पराभवाची चव चारली होती. चार तासांहून अधिक काळ चाललेल्या सामन्यात नदालची चांगलीच दमछाक झाली. नदालला ३-६, ६-३, ७-६, ६-२ ने पराभूत करत जोकोविचने अंतिम फेरी गाठली होती.