टेनिसपट्टू राफेल नदालने विम्बल्डनमधून माघार घेतली आहे. पोटातील स्नायूंच्या दुखापतीमुळे पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्मसन्मानासाठी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे राफेल नदालने म्हटले आहे. राफेलच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला आपल्या कारकिर्दीतील पहिली ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

नदालला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पोटातील स्त्नायूंमध्ये दुखापत होती. मात्र, बुधवारी झालेल्या टेलर फ्रिट्झविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत ही दुखापत वाढली. मात्र, असह्य वेदना होत असतानाही नदालने लढा देत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, आता ही दुखापत वाढल्यानं राफेल नदालने सेमीफायलनमध्ये न खेळण्याचा नर्णय घेतला आहे. ”दुखापतीमुळे पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. माझ्यासाठी विजेतेपदापेक्षा आनंद महत्त्वाचा आहे. ही दुखापत जास्त दीर्घकाळ राहू नये, त्यामुळे मी हा निर्णय घेतला” असल्याचे नदालने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – कोहली चेंडू आधीच खेळण्याचा प्रयत्न करतो -गावस्कर