मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या राफेल नदाल याला तंदुरुस्तीच्या समस्येने ग्रासले आहे. सराव करीत असताना त्याचा घोटा दुखावला व त्याला सराव आटोपता घ्यावा लागला.
नदालच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘‘दुखापत फारशी गंभीर नाही. तथापि पुन्हा सराव केल्यानंतरच तो किती तंदुरुस्त झाला आहे हे कळू शकेल.’’ नदाल याला येथे द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. आतापर्यंत चार वेळा तो या स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. इंडियाना वेल्स येथे झालेल्या स्पर्धेत त्याला उपान्त्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. येथील स्पर्धेत त्याला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. सर्जी स्टाखोव्हस्की (युक्रेन) व निकोलस अल्माग्रो (स्पेन) यांच्यातील विजेत्या खेळाडूशी त्याला दुसऱ्या फेरीत लढत द्यावी लागणार आहे. नदालने हा सामना जिंकला, तर त्याला टॉमस बर्डीच याच्याशी खेळावे लागण्याची शक्यता आहे.
दुखापतीमुळे नदालच्या सरावात अडचणी
मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या राफेल नदाल याला तंदुरुस्तीच्या समस्येने ग्रासले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-03-2015 at 01:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal injury create problems in practice