बीएनपी ओपन स्पर्धेत माजी विजेता राफेल नदाल आणि मारिया शारापोव्हा या दोघांना तिसऱया फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
शारापोव्हाचा कामिला जीओर्जीने ६-३, ४-६, ७-५ असा पराभवा केला आणि कामिलाला पहिल्यांदा स्पर्धेच्या पहिल्या पाच खेळांडूंमध्ये स्थान मिळविता आले. दुसऱया बाजूला, राफेल नदालचा युक्रेनच्या अलेक्झांडर डोल्गोपोलोवने ६-३,३-६,७-६(५) असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.
नदाल-अलेक्झांडर सामन्याचा शेवट रोमांचकरित्या झाला. दोन्ही खेळाडूंनी सामना शेवटच्या क्षणी टायब्रेकरपर्यंत नेला. अखेर अलेक्झांडरने आक्रमक खेळी करत नदालला मागे सारले आणि पुढच्या फेरीचा दरवाजा ठोठावला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-03-2014 at 06:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal maria sharapova knocked out of indian wells masters