ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी स्पर्धेत दररोज चांगली कामगिरी होणे आवश्यक आहे. सातत्याने चांगले खेळून मी ग्रँडस्लॅम स्पर्धेला दाखल झालो तरच जेतेपदाची शक्यता वाढते. चमत्कारांवर माझा विश्वास नाही असे मत राफेल नदालने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर नदाल बोलत होता. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी वेगवान स्वरुपाची कोर्ट्स तयार करण्यात आली आहेत, त्याबाबत विचारले असता नदाल म्हणतो, ‘ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वी तुमचा योग्य सराव झाला नसेल तर जेतेपदाची अपेक्षा बाळगू नये. त्यातून काही प्रेरणा घेण्याची अपेक्षा नाही. दररोजच्या सरावात मी घेत असलेली मेहनतच शेवटी फळाला येते. कोर्ट कशा स्वरुपाचे फारसे महत्त्वाचे नाही. तुम्ही त्या कोर्टच्या स्वरुपाशी जुळवून घेता हे महत्त्वाचे आहे. दोहा आणि मेलबर्न येथील वातावरणात फरक आहे. फार पुढचा विचार करणे योग्य नाही. मेलबर्नमध्ये दाखल झाल्यानंतरच कोर्ट्सचे स्वरुप आणि वातावरण याविषयी बोलू शकेन असे नदालने पुढे सांगितले.