महाराष्ट्राची ऑलिम्पिकपटू राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णवेध करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षापूर्ती केली. तिच्याबरोबर श्रेया गवांडे व वेदांगी तुळजापूरकर यांनी रौप्यपदक मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली. जलतरणात महाराष्ट्राच्या आकांक्षा व्होरा हिने चौथे सुवर्णपदक जिंकताना निर्विवाद वर्चस्व गाजविले. महाराष्ट्राने २३ सुवर्ण, २५ रौप्य व १८ कांस्यपदकांसह एकूण ६६ पदके मिळवित पदकतालिकेत तिसरे स्थान घेतले आहे. सेनादल पहिल्या आणि हरयाणा दुसऱ्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राहीने राष्ट्रकुल स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे तिच्याकडून येथे अव्वल यशाची अपेक्षा होती. तिने २१ गुण नोंदवीत विजेतेपद मिळविले. तिचीच सहकारी श्रेयाने २० गुण नोंदवत रौप्यपदक पटकावले. मध्य प्रदेशच्या सुरभी पाठकला कांस्यपदक मिळाले. ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये वेदांगीचे सुवर्णपदक हुकले. केरळच्या एलिझाबेथ कोशीने ४४५.९ गुणांसह विजेतेपद मिळविले. वेदांगीने ४४४.७ गुण नोंदवत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तामिळनाडूच्या संध्या विन्फ्रेडला कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या अन्य नेमबाजांना पदकावर मोहर नोंदवता आली नाही.
महिलांच्या हॉकीमध्ये पंजाबने महाराष्ट्राचा २-० असा पराभव केला. वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या कोमल वाकळेने ७५ किलो गटात रौप्यपदक मिळवले. महिला टेबल टेनिसमध्ये माधुरिका पाटकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत तिला अंकिता दासने ११-६, ११-७, १४-१२, ११-१ असे हरविले.
आकांक्षा, वीरधवल व जोत्स्नाला सुवर्ण
जलपरी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या आकांक्षा व्होराने १५०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत १७ मिनिटे ४२.४४ सेकंदांत पार केली. तर महाराष्ट्राच्या मोनिक गांधीने कांस्यपदक मिळविले. आकांक्षाने ४ बाय १०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये रौप्यपदक मिळविले आहे. महाराष्ट्राच्या जोत्स्ना पानसरेने ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २९.१२ सेकंदात जिंकून सोनेरी कामगिरी केली. तिचीच सहकारी अवंतिका चव्हाणने हे अंतर २९.१४ सेकंदांत पार करीत रौप्यपदक पटकावले. पानसरेने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रुपेरी यश मिळविताना १ मिनिट ६.०९ सेकंद वेळ नोंदविली. गुजरातच्या मन्ना पटेल हिने हीच शर्यत १ मिनिट ५.३२ सेकंदांत पार करीत सुवर्णपदक जिंकले.
पुरुषांमध्ये वीरधवल खाडे याने ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २४.७३ सेकंदांत जिंकून आपल्या खात्यात आणखी एक पदकाची भर टाकली. त्याचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे.