Rahmanullah Gurbaz and Ibrahim Zadran’s century partnership creates World Cup history for Afghanistan: विश्वचषकाच्या १३व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्यात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली आहे. या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रमही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्षातील तिसरी शतकीय भागीदारी –

याशिवाय गुरबाज आणि जद्रान यांच्यातील ही या वर्षातील तिसरी शतकी भागीदारी आहे. या दोघांनी नुकतीच दोनदा २०० हून अधिक धावांची भागीदारी केली होती. ८ जुलै रोजी चट्टोग्राम येथे बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात, गुरबाज आणि झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी २५६ धावांची भागीदारी केली होता. यानंतर आशिया कपमध्येही या जोडीने पाकिस्तानविरुद्ध २२७ धावांची भागीदारी केली होती. अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला होता, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाचा पराभव झाला होता.

गुरबाज विश्वचषकात अर्धशतक झळकावणारा दुसरा अफगाण खेळाडू ठरला –

या विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी ही पहिली ५०हून सलामीची भागीदारी आहे. या विश्वचषकात आतापर्यंत न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसारखे मोठे संघ जे करू शकले नाहीत ते अफगाणिस्तानने केले आहे. याशिवाय विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी ५०हून धावा करणारा गुरबाज दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी, रहमत शाहने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ५० हून धावांची इनिंग खेळली होती.

हेही वाचा – IND vs PAK: ‘शाहीन शाह आफ्रिदी हा कोणी…’; लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान रवी शास्त्रींनी पाकिस्तान संघाला मारला टोमणा

गुरबाजने खेळली ८० धावांची खेळी –

रहमानउल्ला गुरबाज इंग्लंडविरुद्ध ८० धावांची इनिंग खेळल्यानंतर बाद झाला. त्याने ५७ चेंडूत 8 चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या पॉवरप्लेमध्येही सर्वोच्च धावसंख्या उभारली. अफगाणिस्तानने पॉवरप्लेमध्ये (१-१० षटकांत) एकही विकेट न गमावता ७९ धावा केल्या. यापूर्वी, अफगाणिस्तानने २०१९ विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ६१ धावा जोडल्या होत्या.