Rahmanullah Gurbaz breaks Babar Azam’s record for fastest five centuries: अफगाणिस्तानचा २१ वर्षीय फलंदाज रहमानउल्ला गुरबाजने गुरुवारी आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांनाच थक्क केले. अफगाणिस्तान संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुरबाजने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले. त्याने १२२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार मारत शतक झळकावले. वनडे कारकिर्दीतील या पाचव्या शतकासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
सर्वात वेगवान पाच शतकांमध्ये बाबर आझमला टाकले मागे –
सर्वात वेगवान पाच शतके करणारा गुरबाज जगातील तिसरा फलंदाज ठरला. त्याने या बाबतीत बाबर आझमचा विक्रम मोडला. बाबरने २५ डावात हा पराक्रम केला. गुरबाजने अवघ्या २३व्या डावात हे स्थान गाठले. यासह गुरबाज पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय शतक झळकावणारा पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला.
दुसरी सर्वात मोठी भागीदारी उभारली –
यासह गुरबाजने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. गुरबाजने इब्राहिम झद्रानसोबत २२७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत इब्राहिम झद्रानच्या ८० आणि गुरबाजच्या १३५ धावांचा समावेश होता. विशेष म्हणजे पहिल्या भागीदारीचा विक्रमही या दोन फलंदाजांच्या नावावर आहे.
वनडेमध्ये अफगानिस्तानसाठी सर्वाधिक ओपनिंग भागीदारी –
२ – इब्राहिम झद्रान आणि रहमानुल्लाह गुरबाज
१- इहसानुल्लाह आणि मोहम्मद शहजाद
१- जावेद अहमदी आणि करीम सादिक
१ – जावेद अहमदी आणि रहमानुल्लाह गुरबाज
१ – जावेद अहमदी आणि उस्मान गनी
याआधी ८ जुलै रोजी बांगलादेशविरुद्ध चट्टोग्राममध्ये २५६ धावांची विक्रमी भागीदारी झाली होती. अफगाणिस्तानसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. गुरबाजने ४४ व्या षटकापर्यंत फलंदाजी सुरू ठेवली. त्याच्यासमोर पाकिस्तानच्या एकापेक्षा एक गोलंदाजाला घाम फुटला. अखेर शाहीन आफ्रिदीने त्याला मोहम्मद रिझवानकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. गुरबाजने १५१ चेंडूत १४ चौकार आणि ३