Rahmat Shah becomes 2nd Afghanistan player to score double century : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात एक वेगळाच थरार पाहायला मिळत आहे. हा सामना आता अनिर्णितकडे वाटचाल करताना दिसत असला तरी चार दिवसांच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमत शाहने ऐतिहासिक द्विशतक झळकावले आहे.

रहमत शाह हा पराक्रम करणारा अफगाणिस्तानचा पहिलाच खेळाडू –

विशेषतः रहमत शाहची फलंदाजी अफगाणिस्तानसाठी उत्कृष्ट ठरली. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने २३४ धावांची खेळी साकारली. या डावात रहमतने ४२४ चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने २३ चौकार आणि ३ षटकारही मारले. यासह रहमत अफगाणिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला आहे.

Alzarri Jospeh Banned for 2 Matches by West Indies Cricket Board For On Field Argument with WI Captain Shai Hope vs England ODI Match
अल्झारी जोसेफला रागात मैदान सोडणं पडलं भारी, क्रिकेट वेस्टइंडिजने केली मोठी कारवाई
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Jasprit Bumrah Nominated for t20 ICC Trophies of 2024 Test Cricketer Of The Year and Mens Cricketer Of The Year
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या कामगिरीची ICCने घेतली दखल, एक नव्हे तर दोन मोठ्या पुरस्कारांसाठी केलं नामांकित
Rishabh Pant Sets New Record After 36 Ball Fifty Against New Zealand Broke Yashasvi Jaiswal Record and Becomes First Indian Batter IND vs NZ
IND vs NZ: ऋषभ पंतने न्यूझीलंडविरूद्ध केला मोठा विक्रम, यशस्वी जैस्वालला मागे टाकत ठरला पहिला भारतीय फलंदाज
Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record of Most Runs After First 600 Innings in International Cricket
Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
IND vs NZ 3rd test Washington Sundar Bowled Hattrick against Rachin Ravindra
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल

रहमत शाह द्विशतक झळकावणारा दुसरा अफगाण खेळाडू –

रहमत शाहने २०० धावांचा टप्पा गाठताच, कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो दुसरा अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला. यापूर्वी अफगाण संघाचे कसोटी क्रिकेटमधील एकमेव द्विशतक कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या नावावर होते. शाहिदीने २०२१ साली झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद २०० धावा केल्या होत्या. आता रहमत शाह अफगाणिस्तानसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या सामन्यात फक्त रहमत शाहने नाही तर कर्णधार हशमतुल्ला शाहिदीही झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. रहमत शाह बाद झाल्यानंतर शाहिदीने ताकदीने डाव सांभाळला. शाहिदीने आपले शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच अफगाणिस्तानच्या धावसंख्येने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ५०० धावांचा टप्पा पार केला.

हेही वाचा – ICC Mens T20I ‘क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन जाहीर! बुमराह नव्हे तर ‘या’ भारतीय गोलंदाजाला मिळाले स्थान

यापूर्वी झिम्बाब्वे संघानेही दमदार प्रदर्शन केले होते. झिम्बाब्वेसाठी कर्णधार क्रेग इर्विनसह तीन फलंदाजांनी पहिल्या डावात शतके झळकावली. क्रेग इर्विनशिवाय सीन विल्यम्सने संघाकडून सर्वाधिक १५४ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने १७४ चेंडूंचा सामना केला. ज्यामध्ये त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय ब्रेन बेनेटने ११० धावांची नाबाद खेळी करत झिम्बाब्वेला विक्रमी धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

Story img Loader