भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द घडणवणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला आज ICCच्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामना केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे सुरु आहे. या सामन्याआधी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला.

Story img Loader