Team India New Head Coach Ireland Tour: टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जागी भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतीय भूमीवर होणार्या विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा करार संपत आहे. राहुल द्रविड जाण्यापूर्वीच बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदाची चाचपणी करताना दिसत आहे. त्यामुळे आयर्लंड दौऱ्यावर राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफला विश्रांती देंण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण सारख्या अनुभवी व्यक्तीची नियुक्ती करून भविष्याची तयारी सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाला दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी२० सामने खेळत आहेत. यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारताला १८, २० आणि २३ ऑगस्ट रोजी आयर्लंड दौऱ्यावर तीन टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात आली आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक
वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला दिलासा मिळणार आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्याच्या संघाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्यासह त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांना देखील विश्रांती दिली जाणार आहे. क्रिकबझची बातमी दिली आहे की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी२० सामन्यानंतर द्रविडसह हे सर्व सहकारी मायदेशी परतणार आहेत.
यामुळे बीसीसीआय देत आहे विश्रांती
प्रशिक्षक राहुल द्रविडला आयर्लंडविरुद्ध विश्रांती देण्याचे मुख्य कारण म्हणजे ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी योग्य संघ तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही विश्रांती देण्यात आली आहे. आशिया कप २०२३, ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी, यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
हे खेळाडू संघात पुनरागमन करू शकतात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहची आयर्लंड मालिकेसाठी निवड होण्याची अपेक्षा आहे. भारतीय नेतृत्वाने अलीकडच्या काळात लक्षणीय प्रगती दाखवली आहे. श्रेयस अय्यर उपलब्ध होईल की नाही याची शाश्वती नाही. के.एल. राहुल आयर्लंड मालिकेतच नाही तर आशिया कपमध्येही खेळण्याची शक्यता नाही. राहुल सध्या एनसीएमध्ये सराव करत आहे आणि ताज्या माहितीनुसार, तो अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यावर असतील आणि सितांशु कोटक आणि हृषिकेश कानिटकर हे फलंदाजी प्रशिक्षक आणि ट्रॉय कुली आणि साईराज बहुतुले यांच्यापैकी एक गोलंदाजी प्रशिक्षक बनण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारतीय संघ जेव्हा आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला तेव्हा लक्ष्मण टीम इंडियाचे प्रशिक्षक होता. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही, मात्र हार्दिक पांड्याला आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवलं जाऊ शकतं.